...तर पाण्यासाठी करा ५ लाखांची तजवीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:08 AM2021-03-22T04:08:12+5:302021-03-22T04:08:12+5:30
- २०१३-१४ मध्ये २ काेटी ५ लाखांपेक्षा अधिक. - ६० टक्के सिंचन, ८५ टक्के पेयजलासाठी व औद्याेगिक क्षेत्रासाठी लागणारे ...
- २०१३-१४ मध्ये २ काेटी ५ लाखांपेक्षा अधिक.
- ६० टक्के सिंचन, ८५ टक्के पेयजलासाठी व औद्याेगिक क्षेत्रासाठी लागणारे ५० टक्के पाणी भूजलातूनच.
- विश्व बँकेनुसार जगात २५ टक्के भूजल उपसा एकट्या भारतात. लाेकसंख्या १७ टक्के व उपलब्ध पाणी ४ टक्के.
- १९४७ मध्ये पाण्याची प्रतिव्यक्ती उपलब्धता ६००० घनमीटर, २०२० मध्ये १५०० घनमीटर.
- वाढत्या प्रदूषणामुळे जमिनीतील पाणीही प्रदूषित हाेत आहे.
निसर्गाने मानवाला नेहमीच उदात्त भावनेने भरभरून दिले आहे. पाणीही त्यात आहे पण आपल्याला त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावे लागतील. पाण्याची भविष्यातील गरज लक्षात घेता आज आत्मनिर्भर व्हावे लागेल. भूजल बाेर्डाच्या मदतीने महाराष्ट्रातील हिवरेबाजार व तामसवाडासारखे जलसंवर्धनाचे यशस्वी प्रयाेग झाले. त्याची प्रेरणा घेऊन सर्वात माेठ्या भूजलस्रोताच्या संवर्धनाची जबाबदारी घेणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
- डाॅ. प्रभातकुमार जैन, क्षेत्रीय संचालक, केंद्रीय भूजल मंडळ, नागपूर