Corona Virus in Nagpur; ... तर विदर्भात होतील ७६ हजार कोरोनाग्रस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 07:08 PM2020-04-28T19:08:25+5:302020-04-28T19:09:54+5:30

आरोग्य आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना व मनपा आयुक्तांना पत्र लिहून सजग राहण्याचे आवाहन केले आहे. या पत्राच्या संकेतानुसार विदर्भात कोरोना विषाणूने संक्रमित रुग्णांचा आकडा ७५ हजार ८०१ होण्याची शक्यता असून, त्याअनुषंगाने एवढ्याच बेड्सची गरज भासणार आहे.

... then there will be 76 thousand corona positives in Vidarbha! | Corona Virus in Nagpur; ... तर विदर्भात होतील ७६ हजार कोरोनाग्रस्त!

Corona Virus in Nagpur; ... तर विदर्भात होतील ७६ हजार कोरोनाग्रस्त!

googlenewsNext
ठळक मुद्देआरोग्य आयुक्तांच्या पत्रातील निष्कर्षबेड्सची संख्या वाढविण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशाच्या अन्य क्षेत्रांच्या तुलनेत नागपूरसह संपूर्ण विदर्भात कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा प्रसार तेवढासा चिंताजनक नाही. विदर्भातील बव्हंशी कोरोनाग्रस्त क्वॉरंटाईन करण्यात आलेल्यांतूनच येत आहेत. नव्या भागातही प्रसार मंद आहे. मात्र, येणाऱ्या काळाचा धसका घेता राज्यसरकार सजग झालेले आहे. जास्तीत जास्त रुग्णांच्या व्यवस्थापनाची काळजी घेतली जात आहे. याच श्रृंखलेत आरोग्य आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना व मनपा आयुक्तांना पत्र लिहून सजग राहण्याचे आवाहन केले आहे. या पत्राच्या संकेतानुसार विदर्भात कोरोना विषाणूने संक्रमित रुग्णांचा आकडा ७५ हजार ८०१ होण्याची शक्यता असून, त्याअनुषंगाने एवढ्याच बेड्सची गरज भासणार आहे. पत्र प्राप्त होताच प्रशासनाने रुग्णालयांमध्ये बेड्सची संख्या वाढविण्याच्या दिशेने सुरुवात केली आहे.
हे पत्र १३ एप्रिल रोजीच प्राप्त झाले. प्रत्येक रुग्णावर उपचार झालाच पाहिजे, त्याअनुषंगाने पत्रात संभावित रुग्णांची संख्या सादर करण्यात आली आहे. वर्तमान स्थिती बघता आकडेवारीचे आकलन करणे कठिण आहे तरी देखील तयारीला वेळ मिळावा म्हणूनच ही संभावित आकडेवारी सादर करण्यात आल्याचेही या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. संसर्गाचे किंतु-परंतु या पातळीवर विश्लेषण करता विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये कोविड १९चे जास्तीत जास्त ७५ हजार ८०१ प्रकरणे असतील. त्यात सर्वाधिक प्रकरणे नागपुरात १८ हजार ९०२ असतील. या पत्रात ही आकडेवारी कधीपर्यंतची असू शकेल, याचा उल्लेख नाही. तरीदेखील १० मे पर्यंत एवढे बेड्स उपलब्ध करण्याच्या दिशेने प्रशासन सज्ज झाले आहे. संशयितांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक नागरिकाला क्वॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात येत आहे. मेयो व मेडिकल कॉलेज रुग्णालयात बेड्सची संख्या वाढविली जात आहे. मेडिकलच्या ट्रामा सेंटर्सला कोविड रुग्णालयच्या स्वरूपात परिवर्तित करण्यात आले आहे. येथे १२५० बेड्सची व्यवस्था करण्यात आली असून खाजगी इस्पितळांमध्येही १३२० बेड्सची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

६० टक्के नागरिकांमध्ये लक्षण दिसणार नाही!
पत्रात रुग्णांच्या अंदाजित संख्येच्या ६० टक्के रुग्णांमध्ये कोरोनाचे कोणतेच लक्ष दिसणार नाहीत. २० टक्के रुग्णांमध्ये सौम्य व ऊर्वरित २० टक्के रुग्णांमध्ये स्पष्ट लक्षणे दिसून येतील. केंद्र सरकारच्या दिशा-निदेर्शानुसार या आपातकालिन स्थितीसंदर्•ाात त्रिस्तरीय तयारी केली जात आहे. लक्षण नसणाºया रुग्णांना कोविड केयर सेंटरमध्ये ठेवले जाईल. अन्य रुग्णांची व्यवस्था कोविड हेल्थ सेंटरमध्ये होईल. त्याच अनुषंगाने ४० टक्के बेड्सची संख्या तात्काळ उपलब्ध करण्याचे निर्देश असून ऊर्वरित बेड्सचे व्यवस्थापन टप्प्या टप्प्यात होईल.

स्थळ रुग्णांची सं•ाावित आकडेवारी
नागपूर शहर ११,११४
नागपूर ग्रामीण ७,७८८
यवतमाल ९,६१७
बुलढाणा ८,९६८
अमरावती शहर २,२४२
अमरावती ग्रामीण ७,७६४
अकोला शहर १,४७५
अकोला ग्रामीण ४,८२६
चंद्रपुर शहर ७४०
चंद्रपुर ग्रामीण ४,३२९
वर्धा ४,४९१
वाशिम ४,१४७
गोंदिया ३,०५५
•ांडारा २,७६९
गडचिरोली २,४७६
---------------
एकूण ७५,८०१

Web Title: ... then there will be 76 thousand corona positives in Vidarbha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.