३६ खासगी कोविड रुग्णालयात रुग्णच नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 10:17 PM2020-11-24T22:17:49+5:302020-11-24T22:19:15+5:30
No patients in 36 private Covid hospitals, nagpur news नागपूर जिल्ह्यात मेयो, मेडिकल व एम्स हे तीन शासकीय मिळून खासगीचे ९४ कोविडचे रुग्णालय आहेत. यातील ३६ खासगी रुग्णालयात एकही कोविडचा रुग्ण नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यात मेयो, मेडिकल व एम्स हे तीन शासकीय मिळून खासगीचे ९४ कोविडचे रुग्णालय आहेत. यातील ३६ खासगी रुग्णालयात एकही कोविडचा रुग्ण नाही. मागील काही दिवसांपासूनची ही स्थिती आहे. सध्या शासकीय रुग्णालयात ३२१ रुग्ण तर खासगी रुग्णालयात १११६ रुग्ण उपचाराखाली आहेत. २९०८ रुग्ण होम आयसालेशनमध्ये आहे.
कोविड केअर सेंटरमध्ये ८९ रुग्ण
नागपूर : जिल्ह्यात १९ कोविड केअर सेंटर असून सध्या ८९ कोरोनाचे रुग्ण दाखल आहेत. यात शहरातील आमदार निवास, कारागृह,वनामती सेंटरमध्ये शुन्य असून व्हिएनआयटी सेंटरमध्ये सात तर पाचपावली सेंटरमध्ये १६ रुग्ण आहेत. ग्रामीणमधील नागपूर ब्लॉकमध्ये शुन्य, पारशीवनी ब्लॉकमध्ये तीन, काटोल ब्लॉकमध्ये २०, कळमेश्वर ब्लॉकमध्ये २०, हिंगणा ब्लॉकमध्ये १३, सावनेर ब्लॉकमध्ये शुन्य, मौदा ब्लॉकमध्ये शुन्य, रामटेक ब्लॉकमध्ये सात, उमरेड ब्लॉकमध्ये दोन तर नरखेड ब्लॉकमधील कोविड केअर सेंटरमध्ये शुन्य रुग्ण आहेत.