राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आता सहा सहसरकार्यवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 04:46 AM2018-03-12T04:46:37+5:302018-03-12T04:46:37+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची २०१८-१९ या वर्षाकरिता नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. सलग चौथ्यांदा सरकार्यवाहपदावर नियुक्त झालेल्या भय्याजी जोशी यांनी अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या अखेरच्या दिवशी ही निवड केली.

 There are now six co-workers in the RSS | राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आता सहा सहसरकार्यवाह

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आता सहा सहसरकार्यवाह

Next

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची २०१८-१९ या वर्षाकरिता नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. सलग चौथ्यांदा सरकार्यवाहपदावर नियुक्त झालेल्या भय्याजी जोशी यांनी अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या अखेरच्या दिवशी ही निवड केली. संघात आता चार ऐवजी सहा सहकार्यवाह झाले असून डॉ. मनमोहन वैद्य व मुकुंद सी. आर. यांच्याकडेदेखील ही जबाबदारी देण्यात आली आहे.
या कार्यकारिणीत तरुण पदाधिकाºयांना संधी देण्यात आली आहे. प्रत्येक प्रांतातील स्वयंसेवकांना या कार्यकारिणीत संधी देण्याचा प्रयत्न झाला आहे. मूळचे नागपूर येथील डॉ. मनमोहन वैद्य यांच्याकडे अखिल भारतीय प्रचार प्रमुख ही जबाबदारी होती तर मूळचे कर्नाटकातील बंगळुरुयेथील मुकुंद सी. आर. यांच्याकडे सहबौद्धिक प्रमुख ही जबाबदारी होती. त्यांच्याकडे सहसरकार्यवाहपदाची जबाबदारी दिली आहे. डॉ. कृष्णगोपाल, दत्तात्रेय होसबळे, व्ही.भागय्या व सुरेश सोनी यांच्याकडे अगोदरपासूनच ही जबाबदारी आहे.

Web Title:  There are now six co-workers in the RSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.