जागोजागी लागताहेत कचऱ्याचे ढिगारे ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:10 AM2021-08-12T04:10:25+5:302021-08-12T04:10:25+5:30

एजी एन्व्हायरोकडून नियमांचे सर्रास उल्लंघन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील कचरा संकलन यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी दोन एजन्सीची ...

There are piles of rubbish everywhere. | जागोजागी लागताहेत कचऱ्याचे ढिगारे ()

जागोजागी लागताहेत कचऱ्याचे ढिगारे ()

Next

एजी एन्व्हायरोकडून नियमांचे सर्रास उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरातील कचरा संकलन यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी दोन एजन्सीची नियुक्ती करण्यात आली. परंतु २० महिन्यानंतरही या एजन्सी नियमानुसार काम करीत नाही. शहरात जागोजागी कचऱ्याचे ढिगारे लागत आहेत. पावसाच्या दिवसात कचरा उचलला जात नसल्याने दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त आहेत. आजाराचाही धोका वाढला आहे.

लक्ष्मीनगर झोनमधील खामला चौकानजीक कचरा ट्रान्सफर स्टेशन व नेहरूनगर झोनअंतर्गत श्यामबाग येथे दररोज कचरा जमा होत आहे. तो वेळीच उचलला जात नसल्याने परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. त्यात पावसाच्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरत आहे.

प्रभाग १ ते ५ मधील जबाबदारी एजी एन्व्हायरो तर, ६ ते १० प्रभागाची जबाबदारी बीव्हीजी कंपनीकडे देण्यात आली आहे. नियमानुसार घरातून गोळा करण्यात आलेला कचरा गाडीतून थेट कॉम्पॅक्टरमध्ये टाकून भांडेवाडी येथे न्यावयाचा आहे. परंतु असे न करता ट्रान्सफर स्टेशनवर कचरा जमा केला जात आहे. गेल्या १५ दिवसापासून खामला चौकातील ट्रान्सफर स्टेशनवरील कचरा नियमित उचलला जात नाही. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी झोन कार्यालय व नगरसेवकांकडे तक्रार केली, परंतु याची दखल घेतली नाही.

..........

...तर आयुक्त दंड करणार का?

डेंग्यू-मलेरियाचा प्रादुर्भाव विचारात घेता, खाली प्लॉटवर कचरा वा पाणी साचून असल्यास प्लॉटधारकाकडून दंड वसूल करण्याचा निर्णय मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी घेतला आहे. प्लॉट स्वच्छ करण्यासाठी येणारा खर्च, प्लॉटधारकाकडून वसूल केला जाणार आहे. अशा परिस्थितीत मनपाच्या जागेवरील ट्रान्सफर स्टेशनवर कचरा साचून राहत असेल तर मनपा स्वत:वर दंड आकारणार की कराराचे उल्लंघन करणाऱ्या एजी एन्व्हायरोकडून वसूल करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

.......

कचरागाडी दररोज येत नाही

मनपातील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्यासह नगरसेवकांनी कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या एजी एन्व्हायरो व बीव्हीजी कंपनीवर सभागृहात आरोप केले होते. गेल्या महिनाभरापासून यावर सुनावणी सुरू आहे. परंतु समिती अद्याप कुठल्याची निष्कर्षावर पोहचलेली नाही. दोन्ही कंपन्यांचे अधिकारी नगरसेवकांच्या तक्रारीची दखल घेत नाही. शहरातील अनेक वस्त्यात नियमित कचरागाडी येत नसल्याचा आरोप वनवे यांनी केला आहे.

Web Title: There are piles of rubbish everywhere.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.