सात दिवसांपासून कोरोनामुळे एकही मृत्यू नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:07 AM2021-07-24T04:07:16+5:302021-07-24T04:07:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाची दाहकता अनुभवलेल्या नागपूरमधील स्थिती आता नियंत्रणात आली आहे. सलग सातव्या दिवशी जिल्ह्यात कोरोनामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाची दाहकता अनुभवलेल्या नागपूरमधील स्थिती आता नियंत्रणात आली आहे. सलग सातव्या दिवशी जिल्ह्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. शुक्रवारी जिल्ह्यात एकूण ९ नवे बाधित आढळले. त्यात शहरातील ८ व ग्रामीणमधील एकाचा समावेश होता. शुक्रवारी २० रुग्ण बरे झाले.
२४ तासात जिल्ह्यातील ५ हजार ८९८ नमुने तपासण्यात आले. यात शहरातील ४ हजार ६४२ व ग्रामीणमधील १ हजार २५६ नमुन्यांचा समावेश होता. जिल्ह्यात ०.१५ टक्के संसर्ग दर नोंदविण्यात आला. महिन्याभरापासून जिल्ह्यात संसर्गाचा दर ०.३० टक्क्यांच्या जवळपास आहे. आतापर्यंत नागपूर जिल्ह्यात ४ लाख ९२ हजार ८०४ बाधित आढळले असून १० हजार ११५ मृत्यू नोंदविण्यात आले. तर ४ लाख ८२ हजार ४३३ रुग्ण ठीक झाले.
जिल्ह्यात २५६ सक्रिय रुग्ण
नवीन बाधितांच्या तुलनेत ठीक होणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात २५६ सक्रिय रुग्ण होते. यात शहरातील १९६, ग्रामीणमधील ५२ व जिल्ह्याबाहेरील ८ जणांचा समावेश होता. यापैकी ६२ रुग्ण विविध रुग्णालयांत दाखल आहेत तर उर्वरित १९४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. मेडिकलमध्ये सर्वाधिक १४ तर एम्स व मेयोमध्ये चार रुग्ण दाखल आहेत.
कोरोनाची शुक्रवारची स्थिती
दैनिक चाचण्या: ५,८९८
शहर : ८ रु ग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : १ रुग्ण व ० मृत्यू
ए. बाधित रुग्ण :४,९२,८०४
ए. सक्रिय रुग्ण : २५६
ए. बरे झालेले रुग्ण : ४,८२,४३३
ए. मृत्यू : १०११५