पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सची व्यवहार्यता तपासण्यासाठी एजन्सीची नियुक्तीदेखील नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2022 03:39 PM2022-02-17T15:39:24+5:302022-02-17T15:40:04+5:30

पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्ससाठी प्रयत्नशील असलेले वेदचे उपाध्यक्ष प्रदीप माहेश्वरी म्हणाले की, विदर्भात फक्त रिफायनरी कम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सचा प्रस्ताव होता. आता रिफायनरीची चर्चाच नाही.

There is also no agency appointment to check the feasibility of the petrochemical complex | पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सची व्यवहार्यता तपासण्यासाठी एजन्सीची नियुक्तीदेखील नाही

पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सची व्यवहार्यता तपासण्यासाठी एजन्सीची नियुक्तीदेखील नाही

Next
ठळक मुद्देआठ महिन्यांपूर्वी झाली होती घोषणा : ठोस पावलाची प्रतीक्षाच

कमल शर्मा

नागपूर : विदर्भात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारण्याची घोषणा अद्यापही हवेतच असल्याचे चित्र आहे. या घोषणेला आठ महिने होत आले तरी अद्याप ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. या प्रकल्पाची तांत्रिक व्यवहार्यता तपासण्यासाठी एजन्सीदेखील नेमण्यात आलेली नाही.

२९ जून रोजी तत्कालीन पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिल्लीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विदर्भात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारण्याची घोषणा केली होती.

संपूर्ण विदर्भाचा चेहरा-मोहरा बदलण्याची ताकद या प्रकल्पात असल्याचा दावा करण्यात आला. बुटीबोरी, उमरेड कुही येथेही हा प्रकल्प स्थापन करण्याची मागणी पुढे आली. तो आपल्या भागात आणण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधी सक्रिय झाले. प्रशासनाला निवेदनही देण्यात आले. दरम्यान, विदर्भात रिफायनरी न करता पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समोर आले.

पाच-सहा महिन्यांत टेक्नो फिजिबिलिटी रिपोर्ट येईल, असा दावा फडणवीस यांनी केला. प्रत्यक्षात केंद्र सरकारने तांत्रिक व्यवहार्यता तपासण्यासाठी अद्याप एजन्सीच निश्चित केलेली नाही. याबाबत स्थानिक अधिकारी उघडपणे बोलण्यास तयार नाही. केंद्राकडून मार्गदर्शक सूचना मिळाल्यानंतरही पुढाकार घेतला जाईल, असे सांगून ते उत्तरे देण्याचे टाळत आहेत. एका एजन्सीशी संबंधित लोक नागपूरला पोहोचले असले तरी त्यांनी अधिकृतपणे कोणतेही काम केलेले नाही.

रिफायनरी कम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्समधूनच विकास

पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्ससाठी प्रयत्नशील असलेले वेदचे उपाध्यक्ष प्रदीप माहेश्वरी म्हणाले की, विदर्भात फक्त रिफायनरी कम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सचा प्रस्ताव होता. आता रिफायनरीची चर्चाच नाही. देशात रिफायनरीशिवाय चार पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स आहेत. पण रिफायनरी त्यांच्या जवळच आहे. मात्र ते त्यांच्या क्षमतेनुसार काम करत नसल्याचे चित्र आहे. नागपूर किंवा विदर्भात रिफायनरीसह पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स व्यावहारिक ठरेल व तरच विकास शक्य होईल.

Web Title: There is also no agency appointment to check the feasibility of the petrochemical complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.