शासकीय केंद्रावर नाकावाटे दिला जाणाऱ्या डोसबाबत सरकारकडून प्रस्ताव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2023 08:15 AM2023-01-21T08:15:00+5:302023-01-21T08:15:02+5:30

Nagpur News शासकीय केंद्रावर कोरोना प्रतिबंधक ‘इन्कोव्हॅक’ ही लस उपलब्ध करून देण्यासंदर्भात सरकारकडून कोणाताही प्रस्ताव नसल्याचे संकेत भारत बायोटेकचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. कृष्णा एल्ला यांनी दिले.

There is no proposal from the government regarding the dose to be administered at the government center | शासकीय केंद्रावर नाकावाटे दिला जाणाऱ्या डोसबाबत सरकारकडून प्रस्ताव नाही

शासकीय केंद्रावर नाकावाटे दिला जाणाऱ्या डोसबाबत सरकारकडून प्रस्ताव नाही

Next
ठळक मुद्दे औषधनिर्मिती आणि संशोधनासाठी हवी आयकरात सूट

सुमेध वाघमारे

नागपूर : केंद्र सरकारने भारत बायोटेकच्या कोरोना प्रतिबंधक ‘इन्कोव्हॅक’ या नाकावाटे देणाऱ्या बूस्टर डोसला मान्यता दिली आहे. मात्र ही लस खासगीमध्येच मिळणार आहे. शासकीय केंद्रावर ही लस उपलब्ध करून देण्यासंदर्भात सरकारकडून कोणाताही प्रस्ताव नसल्याचे संकेत भारत बायोटेकचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. कृष्णा एल्ला यांनी दिले.

‘७२व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस’मध्ये ते सहभागी झाले असताना बोलत होते. नाकावाटे देण्यात येणाऱ्या भारत बायोटेकच्या ‘इन्कोव्हॅक’ या बूस्टर लसीला ‘सेंट्रल ड्रग स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन’कडून परवानगी मिळाली. मात्र, ही लस कधी मिळणार याबाबत अद्याप स्पष्ट चित्र नाही. ‘इन्कोव्हॅक’ व ‘कोव्हॅक्सिन’ लसीबाबत डॉ. एल्ला यांनी बोलणे टाळले. खासगीमध्ये ही लस उपलब्ध आहे. परंतु शासकीय लसीकरण केंद्रावर ही लस उपलब्ध करून देण्यासंदर्भात सरकारकडून कुठलीही विचारणा झाली नसल्याचे ते म्हणाले.

- संशोधनाशी निगडित प्रोत्साहन देणारी योजना हवी

औषधनिर्मिती आणि संशोधनासाठी आयकरमधून सूट देण्यात यावी, अशी मागणी डॉ. एल्ला यांनी यावेळी केली. ते म्हणाले, येणाऱ्या बजेटमध्ये संशोधनाशी निगडित प्रोत्साहन देणारी योजना हवी. समजा एखाद्या देशाने एखादी औषधनिर्मिती विकसित केल्यास त्यावर आधारित उत्पादन भारतात करण्याचे ठरविल्यास आयकरात सूट दिली पाहिजे. यामुळे संशोधनावर आधारित क्षेत्रातील नवउद्योजक नावीन्यपूर्ण कल्पना घेऊन पुढे येतील. जीवनावश्यक औषधींवर आयात सवलत दिली पाहिजे, असे केल्यास अनिवासी भारतीय गुंतवणुकीसाठी पुढे येतील, असेही डॉ. एल्ला म्हणाले.

-जीन थेरपी भारतात रुजावी

जीन थेरपी क्रांतिकारी आहे. ती भारतात रुजावी याकरिता वैज्ञानिक आणि सर्वांना अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचा एकच डोस असण्यासाठी संशोधन सुरू आहे. व्हॅक्सिन आणि संशोधनात आपण इतर देशांच्या पुढे आहे, असे डॉ. एल्ला यांनी सांगितले.

- नागपूरचा तर्री पोहा आवडतो

कृष्णा इला म्हणाले, नागपुरात आल्यावर येथील तर्री पोह्याची चव चाखली. खूप आवडले. कमी पैशांत भरपूर पोहे दिले.

Web Title: There is no proposal from the government regarding the dose to be administered at the government center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.