भविष्यातील अडचणींवर आतापासूनच उपाय हवेत : चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 10:58 PM2019-02-01T22:58:59+5:302019-02-01T22:59:56+5:30

उपराजधानीला जागतिक दर्जाचे शहर बनविण्यासाठी आवश्यक असलेली विकासकामे वेगाने सुरू आहेत. मात्र विकास साधत असताना भविष्यातील संभाव्य अडचणी व अडथळ्याचादेखील विचार केला पाहिजे. यावर आतापासूनच उपाय शोधले पाहिजेत. विविध संकल्पनांच्या माध्यमातूनच हे काम होऊ शकते, असे मत राज्याचे ऊर्जामंत्री व राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. ’महापौर इनोव्हेशन अवॉर्ड’अंतर्गत आयोजित ‘हॅकेथॉन’चे शुक्रवारी उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

There must be solutions for future problems: Chandrashekhar Bawankule | भविष्यातील अडचणींवर आतापासूनच उपाय हवेत : चंद्रशेखर बावनकुळे

भविष्यातील अडचणींवर आतापासूनच उपाय हवेत : चंद्रशेखर बावनकुळे

Next
ठळक मुद्दे 'महापौर इनोव्हेशन अवॉर्ड’अंतर्गत आयोजित ‘हॅकेथॉन’चे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीला जागतिक दर्जाचे शहर बनविण्यासाठी आवश्यक असलेली विकासकामे वेगाने सुरू आहेत. मात्र विकास साधत असताना भविष्यातील संभाव्य अडचणी व अडथळ्याचादेखील विचार केला पाहिजे. यावर आतापासूनच उपाय शोधले पाहिजेत. विविध संकल्पनांच्या माध्यमातूनच हे काम होऊ शकते, असे मत राज्याचे ऊर्जामंत्री व राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. ’महापौर इनोव्हेशन अवॉर्ड’अंतर्गत आयोजित ‘हॅकेथॉन’चे शुक्रवारी उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला आ.गिरीश व्यास, आ.जोगेंद्र कवाडे, महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय, मनपा आयुक्त अभिजित बांगर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे, ‘एआयसीटीई’चे सल्लागार दिलीप मालखेडे, ‘नागपूर स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लिमिटेड’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे प्रामुख्याने उपस्थित होते.
नागरिकांच्या जीवनशैलीमध्ये सुलभता आणणाऱ्या अनेक संकल्पनांचा सरकारलाही स्वीकार करावा लागतो. तरुणांनी पुढाकार घेऊन शहर, राज्य व देशाच्या विकासासंबंधी, नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सुलभता आणणाºया संकल्पना मांडल्या पाहिजेत, असे बावनकुळे म्हणाले.
तरुणांच्या संकल्पनांद्वारे शहराच्या विकासात भर घातली जावी, या उद्देशाने ‘महापौर इनोव्हेशन अवॉर्ड’ची संकल्पना पुढे आली. मात्र या नवसंकल्पनांचा स्वीकार करताना आपल्याला आपली मानसिकता व सवयी बदलणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महापौरांनी केले.
आज ‘स्मार्ट’ या शब्दाने संपूर्ण जीवन व्यापले आहे. नवसंकल्पनात्मक तंत्रज्ञानामुळे जीवनशैलीत झपाट्याने बदल होत आहे, असे डॉ.काणे म्हणाले. तर आज तंत्रज्ञानाने विकासाला मोठी गती मिळाली आहे. मात्र या तंत्रज्ञानाचा दुरुपयोग होऊ नये याची काळजी घेतली जाणे आवश्यक आहे, असे डॉ.उपाध्याय यांनी सांगितले.
‘हॅकॉथॉन’मध्ये नागपूरसह वर्धा, बल्लारपूर, औरंगाबाद येथील तरुणांनी सहभागी होउन आपल्या संकल्पनांची प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. सोबतच दिवसभर विविध विषयांवर व्याख्यान व गटचर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले. निखील चांदवानी, श्रीयश जिचकार, केतन मोहितकर, अथर्व मोरोणे, आशिष खोले, सुमीत उरकुडकर, अविनाश सिंग यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

Web Title: There must be solutions for future problems: Chandrashekhar Bawankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.