सर्वच प्रकारच्या प्लास्टिकवर बॅन नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 10:17 PM2018-06-23T22:17:57+5:302018-06-23T22:18:45+5:30
शनिवारी दिवसभर महापालिकेतर्फे प्लास्टिकचा वापर करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र, नेमके कोणत्या प्लास्टिकवर बंदी आहे व कोणते वापरता येईल याबाबत नागरिक तसेच दुकानदारांमध्येही संभ्रम दिसून आला. नागरिकांच्या सोईसाठी लोकमतने महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता बंदी असलेल्या व नसलेल्या दोन्ही वस्तूंची यादीच समोर आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्लास्टिकचा भस्मासूर एवढा माजलाय की आपल्याच अस्तित्वावर तो घाला घालू पाहतोय. पर्यावरणाच्या रक्षणासाठी शेवटी राज्य सरकारला शनिवारपासून प्लास्टिक वापरावर बंदी घालावी लागली. प्लास्टिकबंदी आपल्या सर्वांच्याच फायद्याची आहे. शनिवारी दिवसभर महापालिकेतर्फे प्लास्टिकचा वापर करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र, नेमके कोणत्या प्लास्टिकवर बंदी आहे व कोणते वापरता येईल याबाबत नागरिक तसेच दुकानदारांमध्येही संभ्रम दिसून आला. नागरिकांच्या सोईसाठी लोकमतने महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता बंदी असलेल्या व नसलेल्या दोन्ही वस्तूंची यादीच समोर आली.
यावर आहे बंदी
- सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या
- प्लास्टिक चमचे, कप, ग्लास, स्ट्रॉ
- थर्माकोल ताट, ग्लास, वाट्या
- उत्पादने साठविण्यासाठी असलेली प्लास्टिकची आवरणे
- द्रवपदार्थ साठविण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक
- अन्नपदार्थ साठविण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक
- प्लास्टिक व थर्माकोलच्या सजावटीच्या वस्तू
बंदी नसलेल्या वस्तू
- अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्या
- औषधांचे वेष्टण, सलाईन बॉटल्स
- कृषी क्षेत्रातील सामान साठविण्यासाठीचे प्लास्टिक
- नर्सरीमध्ये वापरले जाणारे प्लास्टिक
- अन्नधान्यासाठी ५० मायक्रॉनवरील पिशव्या
- ५० मायक्रॉनवरील दुधाच्या पिशव्या
- रेनकोट, पेन, टिफीन, डिस्पोजेबल बॅग
- कच्चा माल साठविण्यासाठी वापरात असलेले प्लास्टिक
- टीव्ही, फ्रिजसारख्या उत्पादनांसाठी वापरले जाणारे थर्माकोल
- बिस्कीट, वेफर यांच्या पुड्यांचे वेष्टण