पैसे भरूनही पीक विम्याचा लाभ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 10:41 PM2019-12-27T22:41:51+5:302019-12-27T22:43:11+5:30

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी एका शेतकऱ्याने पीक विमा काढला. संबंधित सीएससी सेंटरकडे त्याने विम्याच्या रकमेचे पैसेही भरले. पण जेव्हा प्रत्यक्ष नुकसान झाले. तेव्हा पीक विम्याचे पैसेच भरले नसल्याचे विमा कंपनीने त्या शेतकऱ्याला सांगितले.

There is no benefit to crop insurance even after paying | पैसे भरूनही पीक विम्याचा लाभ नाही

पैसे भरूनही पीक विम्याचा लाभ नाही

Next
ठळक मुद्देपीक विम्याची ‘सीएससी’ सेंटर कडून लूट : विमा कंपनीने केले हात वर

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी एका शेतकऱ्याने पीक विमा काढला. संबंधित सीएससी सेंटरकडे त्याने विम्याच्या रकमेचे पैसेही भरले. पण जेव्हा प्रत्यक्ष नुकसान झाले. तेव्हा पीक विम्याचे पैसेच भरले नसल्याचे विमा कंपनीने त्या शेतकऱ्याला सांगितले. विशेष म्हणजे ज्या सीएफसी सेंटरद्वारे त्यांनी पीक विमा काढला होता, त्या सेंटरने ओरड केल्यानंतर पीक विम्याचा भरलेला हप्ता परत केला. त्यामुळे या शेतकºयाला पीक विमा काढूनही नुकसान भरपाई मिळू शकली नाही.
सचिन वाट असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते नरखेड तालुक्यातील सावरगाव येथील रहिवासी आहेत. मौजा मालापूर येथे त्यांची साडेतीन एकर शेतजमिन आहे. त्यांनी आपल्या शेतात कापूस आणि सोयाबीन पीक घेतले होते. त्यांनी पीक विमाही काढला. गावातील एका सीएससी सेंटर मधून त्यांनी २३८० रुपये विमा हप्ता ऑनलाईन भरला. त्याची पावतीही त्यांना मिळाली. पुढे अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र त्यांना विम्याचा लाभ मिळाला नाही. पंचनाम्यासाठी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन केले असता, विम्याच्या हप्त्याचे पैसेच जमा झाले नसल्याचे त्यांना कळाले. पुढे त्यांनी माहिती घेतली असता सीएससी सेंटरकडून ऑनलाईन पैसेच भरण्यात आले नसल्याचे लक्षात आले. वाट यांनी सीएससी सेंटरच्या कर्मचाऱ्याशी संपर्क साधला असता पैसे भरल्यावरच पावती मिळाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पुन्हा विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी पैसेच मिळाले नाही, पंचनामे करता येणार नाही, असे स्पष्ट केले. त्यानंतर सीएससी सेंटर चालकाने पैसे परत आल्याचे सांगितले. त्यांना दोन महिन्यानंतर याची माहिती देत पैसे परत करण्याची तयारी दर्शविली. यामुळे वाट यांचे मोठे नुकसान झाले. त्यांना विम्याची रक्कम मिळाली नाही. तसेच नुकसानही झाले, असा प्रकार अनेक शेतकऱ्यांसोबत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाट यांनी उलट तपासणी केल्याने हा सर्वप्रकार समोर आला. ही एकप्रकारे लूट असल्याचे वाट म्हणाले.

Web Title: There is no benefit to crop insurance even after paying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.