धान्याचे एकही पोते खराब झाले नाही

By admin | Published: November 16, 2014 12:46 AM2014-11-16T00:46:12+5:302014-11-16T00:46:12+5:30

‘एफसीआय’च्या (फूड कॉर्पोरेशन आॅफ इंडिया) गोदामांत जागा नसल्याने बाहेर ठेवलेल्या धान्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होण्याचे प्रकार काही नवीन नाहीत. परंतु २०१३-१४ या वर्षात सर्व धान्य गोदामातच

There is no spoil of corn in groves | धान्याचे एकही पोते खराब झाले नाही

धान्याचे एकही पोते खराब झाले नाही

Next

२०१३-१४ वर्षाची आकडेवारी : ‘एफसीआय’ प्रशासनाचा दावा
नागपूर : ‘एफसीआय’च्या (फूड कॉर्पोरेशन आॅफ इंडिया) गोदामांत जागा नसल्याने बाहेर ठेवलेल्या धान्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होण्याचे प्रकार काही नवीन नाहीत. परंतु २०१३-१४ या वर्षात सर्व धान्य गोदामातच ठेवण्यात आले असून एकही पोते धान्य खराब झाले नसल्याचा दावा ‘एफसीआय’च्या जिल्हा कार्यालयाकडून करण्यात आला आहे. माहितीच्या अधिकाराच्या विवरणात ही माहिती देण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे २०१० ते २०१२ या कालावधीत हजारो पोती गहू व तांदूळ गोदामाबाहेर ठेवण्यात आला होता. अशा स्थितीत ‘एफसीआय’च्या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
१ डिसेंबर २०१३ ते ३० आॅगस्ट २०१४ या कालावधीत ‘एफसीआय’च्या नागपूर येथील जिल्हा कार्यालयात किती धान्य साठविण्यात आले, हे धान्य कोणत्या प्रकारचे होते आणि त्याची किंमत काय होती, किती धान्य गोदामाबाहेर ठेवण्यात आले व उंदीर-घुशींमुळे किती धान्य खराब झाले यासंदर्भात विचारणा करण्यात आली होती. यावर ‘एफसीआय’कडून सविस्तर उत्तर देण्यात आले. ‘एफसीआय’ अजनी येथे धान्य साठविण्यासाठी मोठी २१ तर ५ लहान गोदामं आहेत. १ जानेवारी १३ रोजी येथे ४३,१७३.४३० मेट्रिक टन गहू तर २०७७२.२४७ मेट्रिक टन तांदळाचा साठा होता. ३० आॅगस्ट २०१४ रोजी हाच साठा अनुक्रमे ३४,२४४.७१२ मेट्रिक टन व २६,८७०.४२३ मेट्रिक टन इतका होता. २०१३-१४ या कालावधीत गव्हाची किंमत १,७४० रुपये प्रति क्विंटल तर तांदळाचे दर २,५१० रुपये प्रति क्विंटल इतके असल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, या कालावधीत धान्याचे एकही पोते गोदामाबाहेर ठेवण्यात आले नाही व कुठल्याही प्रकारचे नुकसान झाले नाही असे ‘एफसीआय’तर्फे सांगण्यात आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे २०१२-१३ या कालावधीत तर गहू-तांदळाची हजारो पोती गोदामाबाहेर होती. तरीदेखील धान्य अजिबात खराब झाले नव्हते असा दावा ‘एफसीआय’ने केला होता. (प्रतिनिधी)

Web Title: There is no spoil of corn in groves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.