मनपा केंद्रांमध्ये आज लसीकरण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:07 AM2021-07-09T04:07:02+5:302021-07-09T04:07:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शासनाकडून महापालिकेला कोविशिल्ड लसीचा पर्याप्त पुरवठा उपलब्ध न झाल्यामुळे मनपाच्या सर्व लसीकरण केंद्रांवर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासनाकडून महापालिकेला कोविशिल्ड लसीचा पर्याप्त पुरवठा उपलब्ध न झाल्यामुळे मनपाच्या सर्व लसीकरण केंद्रांवर आज शुक्रवारी कोणत्याही वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार नसल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.
१८ वर्षांवरील व ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला व दुसरा डोस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व महाल येथील स्व. प्रभाकर दटके रोगनिदान केंद्र येथे उपलब्ध आहे.
....
लसीकरणाचे योग्य नियोजन करा
नागपूर शहरामध्ये लसीकरण मोहीम सुरू आहे. मात्र लसीकरण केंद्रांवर अनेक समस्या येत आहेत. लसीचा पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना लसीकरण केंद्रांवरून परत जावे लागते. एकूणच संपूर्ण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लसीकरण व्यवस्थेचे योग्य नियोजन करा, असे निर्देश विधी व सामान्य प्रशासन समिती सभापती ॲड. मीनाक्षी तेलगोटे यांनी गुरुवारी बैठकीत दिले.