आली माझ्या घरी ही दिवाळी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 11:29 PM2018-11-06T23:29:00+5:302018-11-06T23:30:46+5:30
दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीला मंगळवारी वंजारीनगर येथे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गीत, संगीत व नृत्याने सजलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन वंजारीनगर क्रिकेट क्लब यांनी केले तर कलासंगम प्रतिष्ठानतर्फे सादरीकरण करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीला मंगळवारी वंजारीनगर येथे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गीत, संगीत व नृत्याने सजलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन वंजारीनगर क्रिकेट क्लब यांनी केले तर कलासंगम प्रतिष्ठानतर्फे सादरीकरण करण्यात आले.
‘तु बुद्धी दे तु शक्ती दे...’ या भक्तिगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर ‘आली माझ्या घरी ही दिवाळी..., या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे..., कजरा मोहब्बत वाला...’ अशी काही सुरेल गाणी कलावंतांनी सादर केली. चिमुकल्या अवनी रानडे हिने ‘एका तळ्यात होती बदके...’ हे भावगीत समरसतेने सादर केले. ईशा रानडेने ‘हवा हवाई...’ हे गीत सादर करून अभिनेत्री श्रीदेवीला श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी किशोर गलांडे यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांचे वाचन करून त्यांना आदरांजली अर्पण केली. यासोबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे भजनही त्यांनी सादर केले. अवनीसह राधिका वानखेडे यांनी ‘घुमर’ या गीतावर बहारदार नृत्य सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढविली. यावेळी योगेंद्र रानडे, राखी शिपोरकर, सोनल मास्टे आणि चमूने विविध लोकप्रिय गाणी सादर केली. निवेदन किशोर गलांडे यांचे होते.
यावेळी कॅप्टन दीपक लिमसे, डॉ. रवी कोल्हे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी कॅप्टन लिमसे यांनी वºहाडी कविता सादर केली.