नागपुरात वाढला गोंगाटच अफाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:07 AM2021-04-01T04:07:50+5:302021-04-01T04:07:50+5:30

निशांत वानखेडे नागपूर : राज्याच्या उपराजधानीचे शहर असलेले नागपूर आता ध्वनिप्रदूषणाचीही उपराजधानी होत आहे. सर्वाधिक गोंगाट असलेल्या शहरांमध्ये मुंबईनंतर ...

There was a lot of noise in Nagpur | नागपुरात वाढला गोंगाटच अफाट

नागपुरात वाढला गोंगाटच अफाट

Next

निशांत वानखेडे

नागपूर : राज्याच्या उपराजधानीचे शहर असलेले नागपूर आता ध्वनिप्रदूषणाचीही उपराजधानी होत आहे. सर्वाधिक गोंगाट असलेल्या शहरांमध्ये मुंबईनंतर नागपूरचाच क्रमांक येईल, अशी स्थिती आहे. शहरात असलेल्या १३ लाखाहून अधिक वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न, कारखान्यातील भोंगे, बाजारात कलकलाट अशा कितीतरी कारणाने बहुतेक परिसरात ध्वनिप्रदूषण प्रमाणापेक्षा अधिक वाढले आहे. विशेषत: राष्ट्रीय व राज्य महामार्ग, अंतर्गत लहान-मोठे रस्ते, बसस्टॅण्ड, रेल्वे स्टेशनलगतच्या वाॅर्डात कानठळ्या बसविणारा गोंगाट वाढला आहे.

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थे(नीरी)ने २०१९-२० मध्ये केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालातून चिंताजनक परिस्थिती समोर येत आहे. नीरीने शहरातील ध्वनी मोजण्यासाठी अनेक व्हॉलेन्टियरद्वारे ७०० लोकेशन्सवर सकाळी ९ ते ११ व सायंकाळी ६ ते ८.३० वाजताच्या दरम्यान मॉनिटरिंग केले. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६, ७ व ६९ वर १३७ लोकेशन्स, राज्य हायवेवर ६८ ठिकाणी, रिंग रोडवर १००, अंतर्गत मोठ्या रस्त्यावर १८८, लहान रस्त्यावर ८८, औद्योगिक क्षेत्रात ५४, बाजारपेठात २४ तर निवासी क्षेत्रात ४१ लोकेशन्सवर प्रत्येकी ३०० रीडिंग घेण्यात आले व सरासरी काढण्यात आली. धक्कादायक म्हणजे या ७०० पैकी ३७४ लोकेशन्सवरचा गोंगाट ८० डेसिबलपेक्षा अधिक आढळून आला. ३२५ लाेकेशन्स ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण ६० डीबी ते ८० डीबीपर्यंत आहे आणि हे प्रमाणही मानकापेक्षा अधिक आहे. केवळ एका लाेकेशन्सवर प्रमाण ६० डीबीच्या खाली हाेते.

स्थळ सॅम्पल लाेकेशन्स ध्वनी किमान सर्वाधिक सरासरी ट्रॅफिक नाॅईस इन्डेक्स (टीएनआय)

राष्ट्रीय महामार्ग १३७ ६१.२ ९७.६ ९० ९९.३

राज्य महामार्ग ६८ ६०.९ ९६ ८९.४ ९७.२

रिंग राेड १०० ६१.४ ९१.४ ९१.४ ९८.४

मेजर राेड १८८ ६१ ९७.६ ९० १०१.६

मायनर राेड ८८ ५९.५ ९६.७ ९०.७ १००.९

इंडस्ट्रीज ५४ ६० ९४.३ ८१.२ ९९.४

कमर्शियल २४ ६३.१ ९९.४ ९२.९ ९६.५

निवासी ४१ ५८.७ ९५.४ ८४.१ ९८.२

= (सर्व व्हॅल्यू डेसिबलमध्ये)

१६ वाॅर्डात गाेंगाट १०० डीबीपेक्षा अधिक

नीरीच्या निरीक्षणात अनेक महत्त्वाचे मुद्दे दिसून येतात.

- रिंग राेडलगत असलेल्या वाॅर्ड ३३ व ३५ मध्ये सर्वाधिक १०५.८ डीबी व १०५.६ डीबीची नाेंद.

- वाॅर्ड क्रमांक १५, १६, १८, १९, २२, २३, २४, २५, २७, २८, ३२, ३३, ३६, ८ मध्ये ध्वनिप्रदूषण १०० डीबीपेक्षा अधिक.

- हे १६ वाॅर्ड एनएच-६, एनएच-७, चंद्रपूर-नागपूर महामार्ग, रिंग राेड, एसएच-२५५, रामेश्वरी, मानेवाडा, हुडकेश्वर, बकरामंडी, टिमकी बाजार, रमना माराेती आदी परिसरातील आहेत.

- वाॅर्ड क्रमांक २, ४, १२, १३, १४, २६, २८, २९, ३४, ३७ आणि ३८ मध्ये प्रदूषण कमी. हे वाॅर्ड शहराच्या आऊटरमधील आहेत.

- डब्ल्यूएचओच्या मानकानुसार मर्यादा ५५ डीबीची आहे. शहरात बहुतेक परिसर ५५ ते ७० डीबीच्या रेंजमध्येच आहे.

- २०१७ च्या गणनेनुसार १२.९ लाख दुचाकी व चारचाकी वाहने. वाहनांच्या हाॅर्नमुळे प्रदूषणात प्रचंड वाढ.

- इमारती व विकास कामांवरील मशीनरीच्या आवाजामुळेही वाढले प्रदूषण.

- बाजारपेठांचाही गाेंगाट प्रदूषणात भर घालणारा.

Web Title: There was a lot of noise in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.