नागपूर रेल्वे स्थानकावर राहणार आठ रेल्वेचा थांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 12:39 AM2020-05-12T00:39:19+5:302020-05-12T00:41:29+5:30

रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयानुसार, १२ मेपासून दिल्लीमधून देशभरातील १५ शहरासाठी अप/डाऊन मार्गावर क्रमश: १५ विशेष रेल्वे सोडल्या जाणार आहेत. या सर्व रेल्वे राजधानी एक्स्प्रेस असतील आणि यासाठी एसी फर्स्ट, सेकंड आणि थर्ड क्लासची तिकिटे दिली जातील. या सर्व रेल्वेचे भाडे राजधानी एक्स्प्रेसच्या नियमित भाड्याएवढे असेल, अशी माहिती रेल्वेच्या अधिकारी सूत्रांनी दिली आहे.

There will be eight train stops at Nagpur railway station | नागपूर रेल्वे स्थानकावर राहणार आठ रेल्वेचा थांबा

नागपूर रेल्वे स्थानकावर राहणार आठ रेल्वेचा थांबा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयानुसार, १२ मेपासून दिल्लीमधून देशभरातील १५ शहरासाठी अप/डाऊन मार्गावर क्रमश: १५ विशेष रेल्वे सोडल्या जाणार आहेत. या सर्व रेल्वे राजधानी एक्स्प्रेस असतील आणि यासाठी एसी फर्स्ट, सेकंड आणि थर्ड क्लासची तिकिटे दिली जातील. या सर्व रेल्वेचे भाडे राजधानी एक्स्प्रेसच्या नियमित भाड्याएवढे असेल, अशी माहिती रेल्वेच्या अधिकारी सूत्रांनी दिली आहे.
या १५ रेल्वेगाड्यांपैकी ८ रेल्वेंना नागपूर स्टेशनवर थांबा दिला जाईल. यात दिल्ली-बिलासपूर, दिल्ली-चेन्नई, दिल्ली-बेंगळुरु आणि दिल्ली-सिकंदराबाद या विशष रेल्वेगाड्यांचा समावेश राहणार आहे. या गाड्यांसाठी आयआरसीटीसीच्या वेबसाईटच्या माध्यमातून आॅनलाईन बुकिंग सोमवारी दुपारी ४ वाजतापासून सुरू झाले. मात्र अचानकपणे बुकिंग लोड वाढल्याने साईट क्रॅ श झाली. हा तांत्रिक दोष दृूर करून सायंकाळी ६ वाजता पुन्हा बुकिंग प्रक्रिया सुरू झाली. मात्र त्यानंतरही प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी बराच त्रास सहन करावा लागला.

नागपुरात थांबणाऱ्या गाड्या

रेल्वे क्रमांक रेल्वेचे नाव दिवस दिनांक आगमन वेळ
02691 बेंगळुरु-नवी दिल्ली स्पेशल १३ मे रोज १५.३५
02492 नवी दिल्ली-बेंगळुरु स्पेशल १३ मे रोज १०.४०
02437 सिकंदराबाद-नवी दिल्ली स्पेशल २० मे बुध. २१.१५
02438 नवी दिल्ली-सिकंदराबाद स्पेशल १७ मे रोज ०५.१०
02433 चेन्नई-नवी दिल्ली स्पेशल १५ मे पासून शुक्र/रवि १५.३५
02434 नवी दिल्ली-चेन्नई स्पेशल १४ मे पासून गुरु/शनि ०५.५०
02441 बिलासपूर-नवी दिल्ली स्पेशल १४ मे पासून सोम/गुरु २१.१५
02442 नवी दिल्ली-बिलासपूर स्पेशल १३ मे पासून बुध/सोम ०६.१०

Web Title: There will be eight train stops at Nagpur railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.