उड्डाणपुलावरून जड वाहतूक जाणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:21 AM2020-12-04T04:21:02+5:302020-12-04T04:21:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वसीम कुरैशी नागपूर : शहरात मेट्रो व रस्त्याची कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी रस्ते डायव्हर्ट केले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वसीम कुरैशी
नागपूर : शहरात मेट्रो व रस्त्याची कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी रस्ते डायव्हर्ट केले आहेत. रिंग रोडचे काम अतिशय संथ आहे. परिणामी शहरातून जाणारी जड वाहने मोठ्या प्रमाणावर उड्डाणपुलांचा वापर करीत आहे. दरम्यान, वाहतूक पोलीस आयुक्त सारंग आव्हाड यांनी याची गंभीर दखल घेत उड्डाणपुलांवरून जड वाहने जाणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे.
डीसीपी आव्हाड यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, उड्डाणपुलावरून जाण्यासाठी आवश्यक साहित्य घेऊन जाणाऱ्या वाहनांसाठी डीसीपी वाहतूक कार्यालयातून परवानगी घ्यावी लागते. त्यानंतरच ती वाहने उड्डाणपुलावरून जाऊ शकतात. अनेक ठिकाणी रस्त्याची कामे सुरू असल्याने वाहन चालक व इतरांना वाहतुकीस अडचणी येत असल्याची बाबही त्यांनी मान्य केली. यासंदर्भात संबंधित एजन्सींना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
बॉक्स
पारडीत ठेकेदार कंपनीच्या वाहनांचे कापले चालान
पारडी येथील उड्डाणपुलाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. कामादरम्यान येथे वाहतुकीस अडचण निर्माण करणाऱ्या कंत्राटदार कंपनीच्या वाहनांवर चालान कारवाई करण्यात आली. डीसीपी आव्हाड यांनी सांगितले की, पुलाच्या वरच्या बाजूला काम सुरू असताना नियमानुसार खालचा रस्ता चांगला असायला हवा, परंतु येथे खड्डे आढळून आले. त्यामुळे एनएचएआयला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. समाधानकारक उत्तर आल्यावरच एनओसी दिली जाईल. या कारणे दाखवा नोटीसमध्ये असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे अपघात झाल्यास एनएचएआयला सहआरोपी बनविले जाईल.
कोट
उड्डाणपुलावरून जड वाहन जाण्यास काहीही अडचण नाही
आमच्या कार्यक्षेत्रात सदर उड्डाणपूल येतो आणि या उड्डाणपुलावरून जड वाहने चालण्यास कुठलीही अडचण नाही. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जड वाहने चालवून त्याची लोड टेस्ट त्यासाठीच करण्यात आली होती.
अभिजित जिचकार, प्रोजेक्ट डायरेक्टर, एनएचएआय