रस्त्यांवर होणार नाही जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:10 AM2020-12-31T04:10:53+5:302020-12-31T04:10:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नवीन वर्षाचा जल्लोष साजरा करण्यासाठी विनाकारण फिरणाऱ्यांविरुद्ध पोलीस कडक कारवाई करणार आहेत. ३१ डिसेंबरच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवीन वर्षाचा जल्लोष साजरा करण्यासाठी विनाकारण फिरणाऱ्यांविरुद्ध पोलीस कडक कारवाई करणार आहेत. ३१ डिसेंबरच्या रात्री नाईट कर्फ्यूमध्येसुद्धा कुठलीही सवलत दिली जाणार नाही. रात्री ११ नंतर हॉटेल, रेस्टारंटसह सर्व प्रतिष्ठाने बंद होतील. सार्वजनिक आयोजनांवरही बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत रात्री ११ वाजतानंतर रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलिसांनी शहरात जाळे पसरविले आहे. महत्त्वांच्या चौकांमध्ये पोलीस तैनात करण्यात आले आहेत. वाहतूक पोलीसही त्यांच्या मदतीला राहील. नशेत वाहन चालवणारे किंवा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहील. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांची वाहने डीटेन केली जातील. नवीन वर्षाच्या जल्लोषाच्या नावावर प्रदर्शन किंवा फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.