... तर बँकांमध्ये घोटाळे होणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 11:17 PM2018-02-17T23:17:00+5:302018-02-17T23:19:48+5:30

देशात मोठ्या कंपन्यांच्या माध्यमातून कमी लोकांना रोजगार मिळाला. याउलट लघु व मध्यम उद्योगांच्या माध्यमातून जास्त लोकांना रोजगार मिळाला आहे. गरजूंना फायनान्स केले तर देशाचा आणि समाजाचा विकास होईल आणि बँकांमध्ये घोटाळे होणार नाहीत, असे मत केंद्रीय सूक्ष्म, छोटे व मध्यम (एसएमई) उद्योगमंत्री (स्वतंत्र कार्यभार) गिरीराज सिंह यांनी येथे केले.

... there will be no scams in the banks | ... तर बँकांमध्ये घोटाळे होणार नाहीत

... तर बँकांमध्ये घोटाळे होणार नाहीत

Next
ठळक मुद्देगिरीराज सिंह : नॅशनल एससी-एसटी हब परिषद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात मोठ्या कंपन्यांच्या माध्यमातून कमी लोकांना रोजगार मिळाला. याउलट लघु व मध्यम उद्योगांच्या माध्यमातून जास्त लोकांना रोजगार मिळाला आहे. गरजूंना फायनान्स केले तर देशाचा आणि समाजाचा विकास होईल आणि बँकांमध्ये घोटाळे होणार नाहीत, असे मत केंद्रीय सूक्ष्म, छोटे व मध्यम (एसएमई) उद्योगमंत्री (स्वतंत्र कार्यभार) गिरीराज सिंह यांनी येथे केले.
एससी-एसटी उद्योजकांच्या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन जगनाडे चौकातील गंगाकाशी हॉटेलमधील सागा हॉलमध्ये शनिवारी करण्यात आले. परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. डॉ. विकास महात्मे, एमएसएमई मंत्रालयाचे सचिव डॉ. अरुण कुमार पांड्या, सहसचिव अल्का अरोरा, डिक्कीचे संस्थापक चेअरमन पद्मश्री मिलिंद कांबळे, एअर मार्शल (व्हाईस चीफ आॅफ एअर स्टॉफ) शिरीष बबन देव आणि एअर मार्शल (एअर आॅफिसर कमांडिंग इन चीफ मेंटनन्स कमांड) हेमंत शर्मा उपस्थित होते.
सिंह म्हणाले, देशातील बँकांचा एनपीए ५२ हजार कोटी आहे. मायक्रो फायनान्सची उलाढाल ७० हजार कोटींपेक्षा जास्त आहे. त्यांचा व्याजदर जास्त असतानाही एनपीए १ ते २ टक्के आहे. ही बाब बँकांनी समजून घ्यावी. बँका कर्ज देताना कागद जास्त मागतात. ही प्रक्रिया सुलभ करावी. एसएमईला बँक ९० दिवसात एनपीए करते. आता १८० दिवसांवर नेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. देशात ८० टक्के रोजगार एसएमई देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
देशात अनेक क्षेत्रात काम झाले आहेत, पण पहिल्यांदा एससी-एसटी युवकांना आत्मनिर्भर बनविणे आणि रोजगार देणारे बनविण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. देशातील एससी-एसटी उद्योजकांच्या तयार मालाला बाजारपेठ आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा केंद्राचा उपक्रम आहे. केंद्रीय मंत्रालयाच्या विभागांसह केंद्रीय उपक्रमांना सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योजकांकडून २० टक्के तयार माल खरेदी करणे बंधनकारक आहे. या २० टक्क्यांपैकी ४ टक्के उत्पादने एससी-एसटी उद्योजकांकडून खरेदी करावे लागतात. त्यांना एनएसआयसी मदत करीत आहे. सिंह म्हणाले, तीन मिनिटात उद्योगाची सुरुवात करता येते. एमएसएमईमध्ये सरकारने इन्स्पेक्टर राज संपविला आहे. ४५ दिवसांच्या आता भुगतानची तरतूद आहे. यासाठी समाधान आणि संबंध हे पोर्टल सुरू केले आहेत. त्यावर ३ हजार तक्रारी आल्या असून १० हजार कोटींचे सेंटलमेंट झाले आहे.
मिलिंद कांबळे म्हणाले, एससी-एसटी नॅशनल हबच्या माध्यमातून युवकांना संधी उपलब्ध झाल्या आहेत. शिक्षित युवकांनी पुढे येऊन रोजगार निर्मितीसाठी पुढे यावे. त्यांनी रोजगार देणारे बनावे. डिक्की संघटनेचे देशात हजारपेक्षा जास्त उद्योजक सदस्य आहेत. त्यांच्या उत्थानासाठी डिक्की कार्यरत आहे. शिवाय त्यांनी रोजगार उभारावा, यासाठीही मार्गदर्शन करीत आहे.
यावेळी एअर मार्शल शिरीष बबन देव आणि हेमंत शर्मा यांनी संरक्षण उपकरणांची माहिती दिली आणि स्वदेशीकरणावर भर दिला. संचालन आरजे मोना यांनी केले तर अल्का अरोरा यांनी आभार मानले.

Web Title: ... there will be no scams in the banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.