काटोल मार्गाच्या चौपदरीकरणात दुकाने व घरे जाणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 09:31 PM2018-03-17T21:31:43+5:302018-03-17T21:31:43+5:30
काटोल मार्गाचे चौपदरीकरण करताना जुना काटोल नाका ते नवीन काटोल नाका या मार्गालगत असलेली दुकाने व घरे तोडली जाणार नाही. सध्याच्या डीपी रोडचेच सिमेंटीकरण करण्यात येईल. अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी गिट्टीखदान-बोरगाव-फ्रेन्डस कॉलनी व्यापारी संघाच्या शिष्टमंडळाला दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काटोल मार्गाचे चौपदरीकरण करताना जुना काटोल नाका ते नवीन काटोल नाका या मार्गालगत असलेली दुकाने व घरे तोडली जाणार नाही. सध्याच्या डीपी रोडचेच सिमेंटीकरण करण्यात येईल. अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी गिट्टीखदान-बोरगाव-फ्रेन्डस कॉलनी व्यापारी संघाच्या शिष्टमंडळाला दिली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुधाकर देशमुख, नगरसेवक नितीश ग्वालबंशी, हरीश ग्वालबंशी,काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष प्रमोद सिंग ठाकूर, व्यापारी संघाचे महेश खंडेलवाल, राजू खंडेलवाल,पप्पू भय्या यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
जुना काटोल नाका ते फेटरी या दरम्यानच्या मार्गाचे चौपदरीकरण के ल्यास या मार्गालगतची दुकाने, घरे यासोबत संरक्षण व वन विभागाची जागा जागा जाणार आहे. गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाची संरक्षक भिंत तोडावी लागणार आहे. याचा विचार करता फेटरीपर्यंत आहे त्या डीपी रोडचे सिमेंटीकरण करण्यात येईल. त्यापुढे चौपदरीकरण के ले जाईल. अशी ग्वाही गडकरी यांनी दिल्याची माहिती सुधाकर देशमुख यांनी दिली.
प्रस्तावित चौपदरीकरण संदर्भात काटोल मार्गावरील प्राचीन हनुमान मंदिरात गेल्या आठवडाभरापासून दररोज व्यापाºयांच्या बैठका होत आहे. गेल्या बुधवारी शहर काँगे्रसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनीही येथील व्यापारी व नागरिकांची बैठक घेतली होती. शुक्रवारी बंदला गिट्टीखदान-बोरगाव फेन्डस कॉलनी व्यापारी संघासोबतचा सर्वपक्षांनी पाठिंबा दर्शवला होता. या आंदोलनात दिलीप खोरगडे, सुरेश गिरडे, नितीन माहुरे, मनोज मदने, अनिल बाजपेयी, हितेश हारोडे, बबली तिवारी, परमात्मा पांडे, हरतीत नरोला, विजय ढोके, नईम भाई, हाजी आसिफ, अंकित नागपाल, राजेश बाली, नंदलाल हिगोरानी, गुरमीत सिंह नरुला, गौरीशंकर खंडेलवाल, इंद्रसेन सिंग ठाकूर, घनश्याम मांगे यांच्यासह परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.