नागपुरात रेमडीसीव्हर औषधीचा तुटवडा पडणार नाही : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 10:20 PM2020-09-19T22:20:40+5:302020-09-19T22:21:51+5:30

नागपूर जिल्ह्यातील शासकीय व खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना आजारासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या ‘रेमडीसीव्हर’ या औषधांचा तुटवडा पडता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शनिवारी पुरवठादार कंपन्यांना दिले आहेत. हॉस्पिटलने अशा पद्धतीचा तुटवडा असल्यास प्रशासनाची मदत घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

There will be no shortage of remedisivor in Nagpur: Collector | नागपुरात रेमडीसीव्हर औषधीचा तुटवडा पडणार नाही : जिल्हाधिकारी

नागपुरात रेमडीसीव्हर औषधीचा तुटवडा पडणार नाही : जिल्हाधिकारी

Next
ठळक मुद्देऔषध पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील शासकीय व खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना आजारासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या ‘रेमडीसीव्हर’ या औषधांचा तुटवडा पडता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शनिवारी पुरवठादार कंपन्यांना दिले आहेत. हॉस्पिटलने अशा पद्धतीचा तुटवडा असल्यास प्रशासनाची मदत घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
नागपूरमधील काही खासगी हॉस्पिटलनी रेमडीसीव्हर औषधांचा तुटवडा जाणवत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आणून दिले होते. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अन्न व औषध प्रशासन विभागाचे उपायुक्त गडेकर यांनी ही बाब लक्षात आल्यानंतर रेमडीसीव्हर पुरवठा करणाऱ्या सिप्ला, हेटेरो, मायलन, गायडस या कंपन्यांच्या नागपूर येथील स्थानिक प्रतिनिधींना याबाबत अवगत केले.
अन्न व औषध प्रशासन विभागाने कोरोना संदर्भातील कोणत्याही औषधा बाबतची कृत्रिम टंचाई जाणवत कामा नये. तसेच नागपूर जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये आवश्यक असणाºया रेमडीसीव्हर औषधांचा नियमित व सुलभ पुरवठा कोविड रुग्णालयांना प्राधान्याने व्हावा, असे या पुरवठादारांना निर्देशित केले आहे.
औषधांचा तुटवडा असल्याबाबत कोरोनाबाधित यांच्या नातेवाईकांना काही ठिकाणी सांगण्यात येत आहे. अशा पद्धतीने औषधांचा तुटवड्याबाबत नागरिकांमध्ये गोंधळ उडवून देऊ नये, अशी सूचनाही जिल्हा प्रशासनाने केली आहे. रुग्ण संख्या वाढत असताना या पद्धतीच्या औषधांचा तुटवडा जाणवणार नाही, यासाठी प्रशासन लक्ष ठेवून आहे.
यापूर्वी ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबतही अशाच पद्धतीच्या अफवा उडत होत्या. मात्र नागपूर येथील शासकीय व खासगी रुग्णालयांसाठी आवश्यक असणारा पुरेसा ऑक्सिजनचा साठा जिल्ह्यात उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भातील गठित समिती ऑक्सिजनच्या तुटवड्याचा दररोज आढावा घेत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ऑक्सिजन पुरवठा संदर्भात अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके हे नोडल अधिकारी असून तुटवडा संदर्भात ०७१२-५६२६६८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: There will be no shortage of remedisivor in Nagpur: Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.