तेथे देहव्यापारासाठी दुसऱ्या शहरातून आणल्या जायच्या तरुणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 08:46 PM2019-01-09T20:46:30+5:302019-01-09T20:47:31+5:30

हॉटेल रेडिसन ब्लू येथील ‘हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट’ चालवताना पकडल्या गेलेली पूजा राव ऊर्फ माया हिचे अनेक शहरांमध्ये नेटवर्क पसरले आहे. ती देह व्यापारासाठी दुसऱ्या शहरांमधून तरुणी बोलवायची. प्राथमिक तपासात पोलिसांना मायाकडून या धंद्याशी जुळलेल्या अनेकांची माहिती मिळाली आहे.

There women from a different city brought to the city for sex business | तेथे देहव्यापारासाठी दुसऱ्या शहरातून आणल्या जायच्या तरुणी

तेथे देहव्यापारासाठी दुसऱ्या शहरातून आणल्या जायच्या तरुणी

googlenewsNext
ठळक मुद्देहॉटेल रेडिसन ब्लूमधील ‘हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट’

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हॉटेल रेडिसन ब्लू येथील ‘हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट’ चालवताना पकडल्या गेलेली पूजा राव ऊर्फ माया हिचे अनेक शहरांमध्ये नेटवर्क पसरले आहे. ती देह व्यापारासाठी दुसऱ्या शहरांमधून तरुणी बोलवायची. प्राथमिक तपासात पोलिसांना मायाकडून या धंद्याशी जुळलेल्या अनेकांची माहिती मिळाली आहे.
पोलिसांच्या एसएसबीने सोमवारी रात्री हॉटेल रेडिसन ब्लू येथील खोली क्रमांक २०२ मध्ये धाड टाकून मायाला पकडले होते.
तसेच कोलकाता येथ्थील एक तरुणीही सापडली होती. ती मायाच्या बोलावण्यावरून ३० डिसेंबर रोजी नागपूरला आली होती. ती सीताबर्डी येथील हॉटेल हरदेव येथे थांबली होती. नंतर मायाने तिला हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये थांबवले होते. पोलिसांना अनेक दिवसांपासून हॉटेलमध्ये देहव्यापार चालत असल्याची माहिती होती. यात माया सक्रिय असल्याची माहितीही पोलिसांना लागली होती. माया इंटरनेटच्या माध्यमातून देहव्यापाराचा धंदा करते. पोलिसांनी डमी ग्राहकाच्या माध्यमातून मायाशी संपर्क साधून तरुणीचा सौदा केला. यानंतर हॉटेल ‘रेडिसन ब्लू’मध्ये धाड टाकून मायाला पकडण्यात आले.
सूत्रानुसार माया पहिल्यांदा २०१६ मध्ये चेन्नई येथे देहव्यापार करताना पकडल्या गेली होती. यानंतर तिला १६ नोव्हेंबर रोजी सदर छावणी येथे पकडण्यात आले. त्यावेळी मायाकडे दिल्ली येथील तरुणी सापडली होती. माया अनेक दिवसांपासून या धंद्यात आहे. ती देहव्यापारात असलेल्या देशभरातील मोठ्या शहरांमधील तरुणींच्या दलालाशी जुळलेली आहे. त्यांच्या माध्यमातून माया नियमितपणे बाहेरच्या शहरातून तरुणी करारावर येथे बोलवत असते. हा करार १० ते १५ दिवसांचा असतो. दोन-तीन दिवसात ग्राहक न आल्यास हा करार वेळेच्या अगोदर तोडून तरुणीला परत पाठवले जाते. मायाच्या ग्राहकांमध्ये आर्थिकदृष्ट्या संपन्न लोकांची संख्या अधिक आहे. ते बाहेरच्या तरुणींची मागणी करतात. यामुळे माया इतर शहरांमधून तरुणी बोलावते. मायाचे म्हणणे आहे की, स्थानिक तरुणीकडून देहव्यापार केल्यास पोलिसांच्या धोक्यासह इतर अनेक प्रकारच्या त्रासाचा सामना करावा लागतो.
यापूर्वीही नागपुरात येऊन गेली तरुणी
मायाकडे सापडलेली केलकातातील तरुणी यापूर्वीही दोन वेळा नागपुरात येऊन गेली आहे. ती डिसेंबर २०१७ मध्ये पहिल्यांदा नागपुरात आली होती. त्यावेळी नवीन वर्षाची कमाई करायला ती नागपुरात आली होती. यानंतर एप्रिल २०१८ मध्ये ती नागपुरात आली. दोन्ही वेळा वेगवेगळ्या दलालांनी तिला बोलावले होते. मायाच्या माध्यमातून ती पहिल्यांदाच नागपुरात आल्याचे सांगत आहे. या प्रकरणाचा तपास करीत असलेली पोलीस चमू कोलकाताला जाणार आहे.

 

Web Title: There women from a different city brought to the city for sex business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.