हे रेल्वेचे आरक्षित डबे आहेत, की कोंबून भरलेली काली-पिली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:08 AM2021-09-23T04:08:45+5:302021-09-23T04:08:45+5:30
विक्रेत्यांची गर्दी जास्त रेल्वेगाड्या प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर विक्रेते मोठ्या संख्येने प्रवाशांना खाद्यपदार्थ विकण्यासाठी गोळा होतात. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होताना ...
विक्रेत्यांची गर्दी जास्त
रेल्वेगाड्या प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर विक्रेते मोठ्या संख्येने प्रवाशांना खाद्यपदार्थ विकण्यासाठी गोळा होतात. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत नाही. रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष पुरविण्याची गरज आहे.
सर्व गाड्यात स्थिती सारखीच
- सध्या नागपूरवरून जाणाऱ्या बहुतांश रेल्वेगाड्यांत प्रवाशांची गर्दी आहे. यात ०२२९६ पटना-बंगळुरू स्पेशल, ०२१०६ गोंदिया-मुंबई स्पेशल, ०६२४९ यशवंतपूर-निजामुद्दीन, ०२०३७ पुरी-अहमदाबाद स्पेशल आणि इतर रेल्वेगाड्यांत प्रवासी खचाखच भरलेले असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी देण्याची मागणी होत आहे.
नागपूर विभागात होते नियमांचे पालन
‘नागपूर विभागातून जाणाऱ्या रेल्वेगाड्यांत केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वेस्थानकाच्या आत प्रवेश देण्यात येतो. इतर विभागात या नियमाचे पालन होत नसल्यास त्यास नागपूर विभाग जबाबदार नाही.’
-एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग
............