ही झाडे छाेट्या वादळातही उन्मळून पडतात ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:11 AM2021-06-09T04:11:28+5:302021-06-09T04:11:28+5:30

- रस्त्याच्या कडेला मुख्यत्वे भरभर वाढणारी विदेशी झाडे लावण्यात येतात. माेठे वाढणारे रेन ट्री, गुलमाेहर, साेनमाेहर आदींचा समावेश अधिक ...

These trees are uprooted even in small storms () | ही झाडे छाेट्या वादळातही उन्मळून पडतात ()

ही झाडे छाेट्या वादळातही उन्मळून पडतात ()

Next

- रस्त्याच्या कडेला मुख्यत्वे भरभर वाढणारी विदेशी झाडे लावण्यात येतात. माेठे वाढणारे रेन ट्री, गुलमाेहर, साेनमाेहर आदींचा समावेश अधिक असताे. वेगाने वाढत असल्याने मुळे कमजाेर असतात व त्यांच्या फांद्याही तुलनेने कमकुवतच असतात. ही झाडे लवकर वाढतात आणि लवकर तुटतातही. या तुलनेत देसी झाडे माेठ्या वादळातही मजबुतीने उभी राहतात.

- दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे नेहमीच्या विकासकामांमुळे त्यांची मुळे तुटत राहतात. कधी रस्ते दुरुस्ती, कधी नाल्या तर कधी केबल टाकण्यासारख्या कामात त्यांची मुळे कापली जातात. त्यामुळे या झाडांचा आधार कमजाेर हाेताे व छाेट्याशा वादळ, वाऱ्यानेही ती उन्मळून पडतात किंवा फांद्या तुटतात.

- तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे ही झाडे एकेकटी उभी असतात. त्यांना इतर झाडांचा आधार मिळत नाही. जंगलातील झाडे एकमेकांच्या मुळांच्या आधाराने मजबुतीने उभी राहतात. तसा आधार यांना मिळत नाही.

Web Title: These trees are uprooted even in small storms ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.