तरंगणारे दगड नव्हेत, ते तर लाखो वर्षांचे जीवाष्म; तज्ज्ञांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2022 12:19 PM2022-11-10T12:19:57+5:302022-11-10T12:22:31+5:30

ऊन, वारा, पावसाच्या प्रभावाने आले दगडाचे रूप

They are not floating stones, they are fossils of millions of years; Expert opinion | तरंगणारे दगड नव्हेत, ते तर लाखो वर्षांचे जीवाष्म; तज्ज्ञांचे मत

तरंगणारे दगड नव्हेत, ते तर लाखो वर्षांचे जीवाष्म; तज्ज्ञांचे मत

Next

निशांत वानखेडे

नागपूर : अंबाझरी तलावात पाण्यावर तरंगणारे दगड प्रत्यक्षात लाख कोटी वर्षांपूर्वीचे जीवाष्म असल्याचे मत भारतीय पुरातत्व विभागाचे वैज्ञानिक डॉ. प्रशांत सोनावणे यांनी व्यक्त केले आहे. अनेक वर्षांच्या ऊन, वारा, पाऊस, चिखल, गाळ अशा वातावरणीय प्रभावाने त्यांना दगडाचे रूप आल्याचे सांगून आतील सूक्ष्म पोकळींमुळे ते पाण्यावर तरंगत असल्याचे ते 'लोकमत'शी बोलताना म्हणाले.

डॉ. सोनावणे यांनी सांगितले, की काही वर्षांपूर्वी चंद्रपूरच्या परिसरात डायनोसारची अंडी सापडली होती. वरून पाहताना ते दगडासारखीच भासत होती. काही दिवसांपूर्वी बांधकामाच्या विटा पाण्यावर तरंगत असल्याची माहिती आली होती. विटा भाजण्यासाठी पालापाचोळा व धान्याचा भुसा वापरला जातो. १२०० डिग्री सेल्सियसपर्यंत उष्णतेत ठेवले जात असल्याने त्यांच्यात धातुसारखा कडकपणा येतो. अनेकदा पालापाचोळा किंवा भुशाचे अवशेष राहत असल्याने विटांच्या आत पोकळी निर्माण होते. कधीकधी अत्याधिक भाजल्यामुळेही पोकळी निर्माण होते. त्यामुळे त्या तरंगतात.

नागपुरातील अंबाझरीसह सेमिनरी हिल्स, वायूसेनानगर हा हजारो-लाखो वर्षांपूर्वी जंगलाचा भाग होता. चंद्रपूरचा भागही असाच असून, येथे कधीकाळी आदिमानवाचे अस्तित्व होते. त्यांचे अवशेष, दगडी हत्यारे यापूर्वीही सापडले आहेत. या अवशेषांवर वातावरणाचा प्रभाव पडत असतो व त्यांना ठोस रूप येते. शहरीकरणामुळे हे अवशेष गडप झाले होते; पण आता ते बाहेर येत आहेत. वरून दगडासारखे वाटणाऱ्या या जीवाष्मांच्या आतमध्ये वातावरणाच्या प्रभावाने सच्छिद्रता (पोरोसिटी) निर्माण झाली आहे. पाण्यात पडल्यानंतर त्यांची घनता कमी होते व ते पाण्यावर तरंगायला लागतात. रामसेतूत असलेले दगड हेसुद्धा जीवाष्माचे रुप असल्याचा दावाही डॉ. सोनावणे यांनी केला आहे.

तरंगणाऱ्या दगडाचे अंतरंग

  • लाखो वर्षांच्या जीवाष्मावर वातावरणामुळे थर जमा होऊन दगडासारखे ठोस रूप आले आहे.
  • जीवाष्माचा आतमधला भाग सच्छिद्र असतो व त्या पोकळीत गॅस भरली असते.
  • पाण्यात पडल्यानंतर पोकळीतील गॅसमुळे त्याची घनता कमी होते व ते तरंगायला लागतात.
  • जीवाष्माच्या दगडांसारख्या रूपाला सेडीमेंटरी रॉक असाही उल्लेख केला जातो.
  • अंबाझरी, सेमिनरी, वायूसेनानगरचा परिसरात आदिमानवाच्या अस्तित्वाचे संकेत मिळतात.

त्यांना सेडीमेंटरी रॉक असेही म्हणतात...

विदर्भाचा प्रदेश हा दख्खनच्या पठारात येतो व हा भाग 'बसॉल्ट खडकाने बनलेला आहे. दीड लाख वर्षांपूर्वी ज्वालामुखीने तो तयार झाला आहे. याशिवाय सेडीमेंटरी रॉकही दिसून येतात. हे सेडीमेंटरी रॉक म्हणजे जीवाष्माचाच प्रकार असल्याचे डॉ. सोनावणे यांनी स्पष्ट केले. ते अनेक लेअरचे ठिसूळ असतात व सच्छिद्रही असतात. ' रामसेतूचा 'पुमाईस' दगड हा सेडीमेंटरी रॉकचाच प्रकार आहे. राजस्थानच्या प्रदेशात मार्बल, संगमरवर, कडप्पा, कोटा अशा खडकांचा प्रकार आहे तर दक्षिण भारतात ग्रेनॉईट, मेट्रॉईट, डोलेरॉईट अशा खडकांचे वेगळे वैशिष्ट आढळते.

Web Title: They are not floating stones, they are fossils of millions of years; Expert opinion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.