'ते' मासे पकडण्यासाठी डॅमवर गेले, चोरट्याने बंद घरातून दागिने पळविले
By दयानंद पाईकराव | Published: July 31, 2023 02:56 PM2023-07-31T14:56:25+5:302023-07-31T15:01:11+5:30
९९ हजार रुपये किमतीचे दागिने चोरी
नागपूर : घराला कुलुप लावून मासे पकडण्यासाठी रामा डॅम येथे गेलेल्या व्यक्तीच्या घरातील ९९ हजार रुपये किमतीचे दागिने अज्ञात आरोपीने चोरून नेले. ही घटना इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी २९ जुलैला सायंकाळी पाच ते रविवार ३० जुलैच्या सकाळी १० वाजताच्या दरम्यान घडली आहे.
सुजित गोपाल मंडल (वय ३०, रा. राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या मागे, रामबाग इमामवाडा) हे आपल्या घराला कुलुप लावून मासे पकडण्यासाठी रामा डॅम येथे गेले होते. अज्ञात आरोपीने त्यांच्या घराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. आरोपीने त्यांच्या घरातील लोखंडी आलमारीत ठेवलेले सोन्याचे ९९ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. मंडल यांनी दिलेल्या तक्रारीवरून इमामवाडाच्या उपनिरीक्षक वैशाली सोळंके यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.