'ते' करीत होते वाघाच्या मिशांची तस्करी; नागपूर-भंडारा वनविभागाची संयुक्त कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 03:07 PM2023-05-02T15:07:35+5:302023-05-02T15:08:05+5:30

व्याघ्र शिकारीच्या प्रकरणांशी आराेपींच्या संबंधांची चाैकशी केली जात आहे.

'They' were smuggling tiger whiskers; Joint operation of Nagpur-Bhandara Forest Department | 'ते' करीत होते वाघाच्या मिशांची तस्करी; नागपूर-भंडारा वनविभागाची संयुक्त कारवाई

'ते' करीत होते वाघाच्या मिशांची तस्करी; नागपूर-भंडारा वनविभागाची संयुक्त कारवाई

googlenewsNext

नागपूर : वाघांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या तीन आराेपींना अटक करण्यात आली आहे. नागपूर व भंडारा वनविभागाच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली. हे आराेपी विशेषत: वाघांच्या मिशांची तस्करी करीत हाेते. त्यांच्याकडून या मिशा जप्त करण्यात आल्या आहेत. व्याघ्र शिकारीच्या प्रकरणांशी आराेपींच्या संबंधांची चाैकशी केली जात आहे.

आराेपींमध्ये लाखणी निवासी ४२ वर्षीय अशफाक शेख, तवेपार निवासी ४९ वर्षीय प्रकाश मते व सावळी निवासी ४५ वर्षीय रवींद्र बारई यांचा समावेश आहे. भंडारा येथे वाघांच्या मिशांची तस्करी हाेणार असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार वनविभागाचे पथक नजर ठेवून हाेते. नागपूर वनविभागाचे विशेष पथक तयार करून भंडारा विभागाच्या सहकार्याने १मे राेजी लाखणी वनपरिक्षेत्रात सापळा रचून संयुक्त कारवाई करीत आराेपींना मिशांसह ताब्यात घेण्यात आले. यावेळी आराेपींकडून १७ मिशा जप्त करण्यात आल्या.

नागपूर प्रादेशिकचे मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा व भंडाराचे उपवनसंरक्षक राहुल गवई यांच्या मार्गदर्शनात विभागीय वनअधिकारी पी.जी. काेडापे, उमरेडचे सहायक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवार, प्रमाेद वाडे, य.द. ताडाम, निलेश तवले, गणेश जाधव, दिनेश पडवळ, विनाेद शेंडे, सुधीर कुलरकर, संदीप धुर्वे आणि भंडारा वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी या कारवाईत सहभागी हाेते. भंडाराचे वनसंरक्षक साकेत शेंडे हे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: 'They' were smuggling tiger whiskers; Joint operation of Nagpur-Bhandara Forest Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.