चोरांनाही बसले उन्हाळ्याचे चटके; त्यांनी मारला आईसक्रीमवरच डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2023 09:21 PM2023-03-31T21:21:36+5:302023-03-31T21:23:41+5:30

Nagpur News पोलिसांना गुंगारा देत चोरी करणाऱ्या चोरट्यांनादेखील बहुतेक उकाड्याचा त्रास होऊ लागला आहे. म्हणूनच की काय ओंकारनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी एका दूध कंपनीच्या ‘आऊटलेट’ला फोडले व तेथून हजारो रुपयांचे आईसक्रीम चोरून नेले.

Thieves also got the summer heat; They beat him on the ice cream | चोरांनाही बसले उन्हाळ्याचे चटके; त्यांनी मारला आईसक्रीमवरच डल्ला

चोरांनाही बसले उन्हाळ्याचे चटके; त्यांनी मारला आईसक्रीमवरच डल्ला

googlenewsNext


नागपूर : उपराजधानीत उन्हाचे चटके जाणवू लागले असून दिवसेंदिवस पारादेखील चढायला लागला आहे. पोलिसांना गुंगारा देत चोरी करणाऱ्या चोरट्यांनादेखील बहुतेक उकाड्याचा त्रास होऊ लागला आहे. म्हणूनच की काय ओंकारनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी एका दूध कंपनीच्या ‘आऊटलेट’ला फोडले व तेथून हजारो रुपयांचे आईसक्रीम चोरून नेले.

अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. सैन्यातून सेवानिवृत्त झालेले कमलेश उमाडे यांचे ओंकारनगर चौकात ‘मदरडेअरी‘चे आऊटलेट आहे. तीन दिवसांअगोदर त्यांनी रात्री आऊटलेट बंद केले व नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी आऊटलेट उघडायला गेले असता शटर तुटलेले होते. चोरट्यांनी आऊटलेटमधील रोख पैसे, चीज, ज्यूसच्या बॉटल्ससह विविध फ्लेवर्सच्या आईसक्रीमचे बॉक्स लंपास केले. चोरट्यांनी जवळपास ११ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. उमाडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Thieves also got the summer heat; They beat him on the ice cream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.