पकडल्या जाण्याच्या भितीने चोरट्यांनी ‘सीसीटीव्ही डीव्हीआर’देखील पळविला

By योगेश पांडे | Published: August 9, 2023 03:00 PM2023-08-09T15:00:31+5:302023-08-09T15:01:27+5:30

अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल

Thieves also ran away with the 'CCTV DVR' for fear of being caught | पकडल्या जाण्याच्या भितीने चोरट्यांनी ‘सीसीटीव्ही डीव्हीआर’देखील पळविला

पकडल्या जाण्याच्या भितीने चोरट्यांनी ‘सीसीटीव्ही डीव्हीआर’देखील पळविला

googlenewsNext

नागपूर : बंद असलेले घर फोडून ७.३१ लाखांची रोकड चोरणाऱ्या चोरट्यांनी पकडल्या जाण्याच्या भितीने सीसीटीव्हीचा डीव्हीआरदेखील पळविला. राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

जनार्दन काशीनाथ नंदनवार (६३, भाऊसाहेब सुर्वे नगर) हे ७ ऑगस्ट रोजी घराला कुलूप लावून पुण्याला गेले होते. त्यानंतर अज्ञात आरोपींनी घराच्या मुख्य दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व लोखंडी कपाटातील कुलूप तोडून ७.३१ लाख रुपये रोख लांबवले. रोकड घेऊन पळ काढत असताना चोरट्यांना घरातील सीसीटीव्ही दिसले. पकडल्या जाण्याच्या भितीने चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआरदेखील पळविला. नंदनवार यांच्या तक्रारीवरून राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: Thieves also ran away with the 'CCTV DVR' for fear of being caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.