चक्क हॉस्पिटलमध्ये चोरट्यांचा डल्ला, सीसीटीव्हीदेखील नेला, नागपुरातील घटना

By योगेश पांडे | Published: October 27, 2023 05:50 PM2023-10-27T17:50:25+5:302023-10-27T17:50:32+5:30

चोरट्यांनी लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक इस्पितळ फोडले

Thieves raided the hospital, CCTV was also taken, incident in Nagpur | चक्क हॉस्पिटलमध्ये चोरट्यांचा डल्ला, सीसीटीव्हीदेखील नेला, नागपुरातील घटना

चक्क हॉस्पिटलमध्ये चोरट्यांचा डल्ला, सीसीटीव्हीदेखील नेला, नागपुरातील घटना

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: एरवी घरे, दुकाने फोडणाऱ्या चोरट्यांनी आता चक्क इस्पितळांकडे मोर्चा वळवला आहे. टी.बी.वॉर्डात झालेल्या चोरीनंतर आता चोरट्यांनी लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक इस्पितळ फोडले व रोख रक्कम चोरून नेली.

डॉ.अमित देवदत्त खोब्रागडे (४८, ऑटोमोटिव्ह चौक) यांचे जुनी मंगळवारी येथे खोब्रागडे हॉस्पिटल आहे. २५ ऑक्टोबर रोजी त्यांनी रात्री हॉस्पिटल बंद केले व ते घरी गेले. रात्री अज्ञात चोरट्याने हॉस्पिटलच्या दरवाजाची कडी तोडली व आत प्रवेश केला. चोरट्यांनी तेथईल केबिनचा दरवाजा व टेबलच्या ड्रॉवरचे कुलूप तोडले व आतील ८९ हजार रुपये रोख चोरून नेले. जाताना चोरट्यांना सीसीटीव्ही दिसले व त्यांनी थेट डीव्हीआरच उचलून नेला. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉ.खोब्रागडे यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांच्या तक्रारीवरून लकडगंज पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: Thieves raided the hospital, CCTV was also taken, incident in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.