'तपासामध्ये गोष्टी गोपनीय ठेवाव्या लागतात, दोषींना सोडणार नाही'; देशमुख हत्या प्रकरणी फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 20:10 IST2025-01-17T20:10:07+5:302025-01-17T20:10:47+5:30

Walmik Karad : बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Things have to be kept confidential in the investigation, the guilty will not be spared'; Devendra Fadnavis clearly stated in the Deshmukh murder case | 'तपासामध्ये गोष्टी गोपनीय ठेवाव्या लागतात, दोषींना सोडणार नाही'; देशमुख हत्या प्रकरणी फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

'तपासामध्ये गोष्टी गोपनीय ठेवाव्या लागतात, दोषींना सोडणार नाही'; देशमुख हत्या प्रकरणी फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Walmik Karad ( Marathi News ) :बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. मुख्य संशयीत आरोपींपैकी तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर एक आरोपी अजूनही फरार आहे. आरोपी कृष्णा आंधळे फरार असून त्याच्या शोधासाठी सीआयडीने पाच पथके तयार केली आहेत. दरम्यान, ताब्यात असलेल्या आरोपींविरोधात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पवनचक्की कंपनीला खंडणी मागिल्या प्रकरणातील संशयीत आरोपी वाल्मीक कराड याच्याविरोधातही मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आता तपासाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपडेट दिली. 

Maharashtra Politics: शरद पवारांना धक्का! बडा नेता अजित पवार गटात पुन्हा प्रवेश करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यामांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तपासाबाबत अपडेट दिली. हे प्रकरण सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे देण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. तर या प्रकरणी कोणीही राजकारण करु नये असा सल्लाही त्यांनी दिला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जर तपास यंत्रणांना आपण नीट करु दिला नाही आणि तपास करत असताना तपासातील गोष्टी गोपनीय ठेवाव्या लागतात त्यामुळे मला असं वाटतं की, तपास यंत्रणांवर दबाव न आणता त्यांना काम करु दिले पाहिजे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

"कुठल्याही परिस्थितीत दोषी व्यक्तीला सोडलं जाणार नाही.  या प्रकरणात उज्ज्वल निकम यांच्यासारखे एक वकील द्यावेत असा आपला प्रयत्न आहे. पण, त्यांना आम्ही विनंतीही केली आहे. पण त्यांनी सांगितले की, मला नेमल्यानंतर काही लोक राजकारण करतात. त्याला राजकीय रंग देतात हे मला योग्य वाटत नाही, असं उज्ज्वल निकम मला म्हणाले. देशात अनेक वकील आहेत, जे वेगवेगळ्या पक्षात आहेत. त्यांच राजकारण होत नाही. पण उज्ज्वल निकम यांचे राजकारण करणे म्हणजे गुन्हेगारांना मदत करणे, असा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्यांनी एखादी केस घेतली तर खरे गुन्हेगार आहेत. त्यांना शिक्षा होते हा उज्ज्वल निकम यांचा इतिहास आहे. आता कोणाला गुन्हेगारांना वाचवायचे असेल ते उज्ज्वल निकम यांना विरोध करतील, असंही फडणवीस म्हणाले. आतापर्यंत जी माहिती पोलिसांनी दिली आहे, त्याच्या पुढची माहिती नाही. पोलीस यावर काम करत आहेत. या प्रकरणावर लवकरच पोलीस कारवाई करतील यावर माझा विश्वास आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

Web Title: Things have to be kept confidential in the investigation, the guilty will not be spared'; Devendra Fadnavis clearly stated in the Deshmukh murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.