तिसऱ्या टप्प्यातील २५ टक्के जागा ‘रेड अलर्ट’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:07 AM2021-04-06T04:07:57+5:302021-04-06T04:07:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क हावडा : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी ३१ जागांवर मतदान होईल. हावडा, हुगळी व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
हावडा : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी ३१ जागांवर मतदान होईल. हावडा, हुगळी व दक्षिण चौबीस परगणा येथील या जागा असून, यातील २५ टक्के जागांना निवडणूक आयोगाने ‘रेड अलर्ट’ श्रेणीत ठेवले आहे. या टप्प्प्यातील २६ टक्के उमेदवारांविरोधात गुन्हेगारी स्वरूपाचे खटले सुरू आहेत.
ज्या विधानसभेच्या जागांवर निवडणूक लढणाऱ्यांपैकी कमीत कमी तीन उमेदवारांविरोधात गुन्हेगारी खटले सुरू असतात, तेथे ‘रेड अलर्ट’ घोषित केला जातो. दुसऱ्या टप्प्यात नंदीग्राममध्ये झालेल्या हिंसाचारानंतर आयोगाने हे पाऊल उचलले आहे. यात चार जागा दक्षिण चौबीस परगणा येथील असून, प्रत्येकी दोन-दोन जागा हावडा व हुगळी जिल्ह्यातील आहेत. एकूण उमेदवारांपैकी केवळ सहा टक्के उमेदवार महिला आहेत. या टप्प्यात तृणमूल काँग्रेस व भाजपमध्येच प्रमुख लढत असल्याचे मानले जात आहे. दोन्ही पक्षांतील दिग्गज नेत्यांनी प्रचारासाठी कंबर कसली होती.
हिंसाचार टाळण्याचे आव्हान
दुसऱ्या टप्प्यात मतदानादरम्यान हिंसाचार झाला होता. त्यामुळे या टप्प्यात येथे हिंसाचार टाळण्याचे मोठे आव्हान सुरक्षा यंत्रणेसमोर राहणार आहे. केंद्रीय सुरक्षा दलाच्या ८३२ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. यातील २१४ ‘क्यूआरटी’च्या तुकड्या आहेत.
असा आहे दुसरा टप्पा
एकूण जागा - ३१
रिंगणातील उमेदवार : २०५
मतदार : ७८,५२,४२५
पोलिंग बूथ : १०,८७१
गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार
- २०५ पैकी ५३ (२५ टक्के) उमेदवारांविरोधात फौजदारी खटले सुरू (भाजप - ६१ टक्के, तृणमूल - ३६ टक्के, माकपा - ६२ टक्के, काँग्रेस - ४३ टक्के)
- ४३ (२१ टक्के) उमेदवारांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे (भाजप - ५२ टक्के, तृणमूल - ३२ टक्के, माकपा - ३९ टक्के)
अशी आहे उमेदवारांची संपत्ती
- ३३ (१६ टक्के) उमेदवार कोट्यधीश (भाजप - २६ टक्के, तृणमूल - ५५ टक्के, काँग्रेस - २२ टक्के, फॉरवर्ड ब्लॉक - ५० टक्के, कॉंग्रेस- १४ टक्के, माकपा - ८ टक्के)
उमेदवारांचे शिक्षण
शिक्षण - उमेदवारांची टक्केवारी
अशिक्षित - १ टक्के
बारावीपर्यंत - ५० टक्के
पदवी व पदव्युत्तर - ४६ टक्के
पदविका - १ टक्के