तिसरी लाट केवळ निष्काळजीपणामुळेच येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:08 AM2021-09-13T04:08:34+5:302021-09-13T04:08:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : कोरोनाची दुसरी लाट सांगून आलेली नव्हती. तिसरी लाट येणार की, नाही हेसुद्धा खात्रीलायक कुणीही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : कोरोनाची दुसरी लाट सांगून आलेली नव्हती. तिसरी लाट येणार की, नाही हेसुद्धा खात्रीलायक कुणीही सांगू शकत नाही आणि आलीच तर केवळ नागरिकांच्या निष्काळजीपणामुळेच येईल, असा सूर उमरेड येथील संभाव्य कोरोना तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी व योजना प्रशिक्षण वर्गात मान्यवरांनी व्यक्त केला. मास्क वापरा, अंतर ठेवा, हात स्वच्छ धुवा आणि परिसर स्वच्छता राखा. काळजी घ्या, आदी संपूर्ण बाबींवर मुद्देसूद व मौलिक माहिती उपस्थितांनी दिली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उमरेड तालुका व नगरच्या वतीने आशीर्वाद सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उमरेड तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कृष्णकुमार मिश्रा, उमरेड नगर संघचालक अनिल गोविंदानी, रामटेक विभाग कार्यवाह राजेश बोंद्रे, उमरेड जिल्हा सहकार्यवाह चंद्रशेखर कारमोरे, दिलीप राऊत, लोकेश कोल्हे, अमित तोंडे, आदी उपस्थित होते.
डॉ. जितेश चव्हाण यांनी कोरोनाचे लक्षण, स्वरूप व बचाव, संगीता मिश्रा यांनी योगासन व प्राणायाम, प्राची वरघणे यांनी सकस आहार, तसेच डॉ. सारंग देवसरकार यांनी वैद्यकीय उपकरण हाताळण्याचे प्रशिक्षण या विषयावर मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल माळी यांनी केले. सचिन चट्टे यांनी आभार मानले. कार्यशाळेस आशिष सोनेकर, सुहास डोमडे, सागर राऊत, प्रशांत देशपांडे, कृष्णा भिसे, स्वराज पोटे, तन्मय मानकर, स्वप्निल भिसे, रमाकांत कागदेलवार यांनी सहकार्य केले.