थर्टी फर्स्टला मद्यपींवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 12:12 AM2019-12-31T00:12:06+5:302019-12-31T00:13:38+5:30

शनिवारपासूनच ड्रंक अँड ड्राईव्ह अभियान सुरू करण्यात आले आहे. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांची संख्या ३१ डिसेंबरला वाढणार असल्यामुळे पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे.

On Thirty First action will take on alcoholics | थर्टी फर्स्टला मद्यपींवर होणार कारवाई

थर्टी फर्स्टला मद्यपींवर होणार कारवाई

Next
ठळक मुद्देब्रॅथ अ‍ॅनालायझरने होणार तपासणी

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : थर्टी फर्स्टला दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या मद्यपींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
दारू पिऊन वाहनचालक वेगाने वाहन चालवून आपल्यासह इतरांच्या जीवाला धोका निर्माण करतात. अशा वाहनचालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील १० झोनमध्ये नाकाबंदी करण्यात येणार आहे. यात २ स्पीड गन गाड्या, ३० ब्रेथ अ‍ॅनालायझर, टिंटोमीटर (ध्वनिक्षेपण यंत्र) व जीपीआरएस कनेक्टिव्हीटी असलेले वाहन तैनात करण्यात आले आहे. शनिवारपासूनच ड्रंक अँड ड्राईव्ह अभियान सुरू करण्यात आले आहे. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांची संख्या ३१ डिसेंबरला वाढणार असल्यामुळे पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे.
परवाना होणार रद्द
वाहतूक पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी सांगितले की, नव्या वर्षाचे स्वागत नागरिकांनी उत्साहाने करावे. परंतु वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. दारू पिऊन वाहन चालविण्याचे टाळावे. मागील वर्षी दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांची यादी पोलिसांकडे आहे. या वर्षीही दारू पिऊन वाहन चालविल्यास त्यांचा वाहन चालविण्याचा परवाना रद्द करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: On Thirty First action will take on alcoholics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.