साडेसात लाख मतदारांनी फिरवली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 05:47 AM2019-04-13T05:47:08+5:302019-04-13T05:47:16+5:30

यवतमाळ-वाशिम मतदारसंघ; मतदान टाळणाऱ्यांची कोण दखल घेणार?

Thirty-seven lakh voters shuffled | साडेसात लाख मतदारांनी फिरवली पाठ

साडेसात लाख मतदारांनी फिरवली पाठ

Next

राजेश निस्ताने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : निवडणूक विभागाने जनजागृती करूनही लोकसभेच्या निवडणुकीत शंभर टक्के मतदान होऊ शकलेले नाही. यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील थोडेथोडके नव्हे, तब्बल ७ लाख ४४ हजार ९७९ मतदार मतदानापासून लांब राहिले. हे मतदार देशभक्त नाहीत का, मतदान प्रक्रियेबाबत एवढी उदासीनता असण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


या मतदारसंघात १९ लाख १४ हजार ७८५ एकूण मतदार आहेत. सर्व मतदारांनी मतदान करणे सक्तीचे नसले तरी सक्षम लोकशाहीसाठी गरजेचे होते. त्यामुळेच शंभर टक्के मतदानाचा आकडा गाठण्यासाठी निवडणूक आयोगाने जनजागृती केली होती. प्रत्यक्षात पाच वर्षापूर्वी झालेल्या ५८ टक्के मतदानापेक्षा फक्त तीन अंकाने मतदानाची टक्केवारी वाढू शकली. ६१.०९ टक्के मतदान झाल्याची नोंद प्रशासनाने जाहीर केली आहे. गेल्या पाच वर्षात देशभक्तीची एक ‘वेगळी’ चर्चा यवतमाळ-वाशिमच नव्हेतर संपूर्ण देशभरात सुरू आहे. सरकारवर टीका करणाऱ्यांना देशद्रोही ठरविण्याची जशी टूम आली, तशीच ‘आम्हाला देशभक्तीचे प्रमाणपत्र इतरांनी देण्याची गरज नाही’, असे दणक्यात सांगणाºयांचीही संख्या वाढली. मग देशभक्तीचा ठेका घेणाºया या भारतीयांना लोकशाही प्रक्रियेत भाग घेणे का जीवावरचे ओझे वाटले? हा प्रश्न आहे.

यवतमाळ-वाशिम मतदारसंघात तब्बल ७ लाख ४४ हजार ९७९ मतदारांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य टाळले.
मतदानासाठी युद्धभूमीवर जाण्याची गरज नव्हती, हाती बंदूक घेण्याची गरज नव्हती, तोंडाची वाफ गमावून विरोधकांवर टीका करण्याची गरज नव्हती. गरज होती ती फक्त स्वाभिमानाने जाऊन योग्य उमेदवाराला मत देण्याची. पण सोशल मीडियात देशभक्ती फारवर्ड करणाºयांनी हे साधे राष्ट्रीय कर्तव्य बजावले नाही.

का टाळले मतदान?
उन्ह खूप होते, काय करायचे मतदान करून? कोणीही निवडून आले तरी काय फरक पडतो?- मी नोकरीसाठी बाहेरगावी असतो, कसे मतदान करणार? मतदार यादीत नावच सापडले नाही. मतदान टाळण्याची अशी अनेक कारणे सांगितली जात आहेत.

Web Title: Thirty-seven lakh voters shuffled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर