'ही क्रूरतापूर्ण कृती', कोंबडा झुंजीसाठीची याचिका कोर्टाने फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 08:38 AM2022-09-22T08:38:40+5:302022-09-22T08:39:22+5:30

पायांना धारदार ब्लेड बांधलेल्या कोंबड्यांमध्ये झुंज घडवून आणणे, ही क्रूरतापूर्ण कृती आहे.

This is an act of cruelty, the petition for cockfighting is rejected | 'ही क्रूरतापूर्ण कृती', कोंबडा झुंजीसाठीची याचिका कोर्टाने फेटाळली

'ही क्रूरतापूर्ण कृती', कोंबडा झुंजीसाठीची याचिका कोर्टाने फेटाळली

googlenewsNext

नागपूर : राज्यामध्ये कोंबडा झुंजीला अधिकृत खेळाची मान्यता मिळावी, याकरिता संत्रानगरीतील शेतकरी गजेंद्र चाचरकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात दाखल केलेली जनहित याचिका बुधवारी फेटाळून लावली. न्यायमूर्ती सुनील शुक्रे व गोविंद सानप यांनी हा निर्णय दिला.

पायांना धारदार ब्लेड बांधलेल्या कोंबड्यांमध्ये झुंज घडवून आणणे, ही क्रूरतापूर्ण कृती आहे. या खेळामुळे कोंबडे रक्ताने माखले जातात. बऱ्याचदा कोंबड्यांचा मृत्यू होतो. परिणामी, कोंबडा झुंजी आयोजनावरील बंदीमध्ये हस्तक्षेप करता येणार नाही, असे हा निर्णय देताना स्पष्ट करण्यात आले. 
देशामध्ये कोंबडा झुंजी आयोजनावर बंदी आहे; परंतु कोंबड्यांचा आहारासाठी बळी घेण्यावर बंदी नाही. आंध्र प्रदेश येथे कोंबडा झुंजीत केवळ तीन दिवसांत ९०० कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. ही बाब लक्षात घेता झुंजी गरजेच्या आहेत. त्यामुळे अर्थकारणाला चालना मिळेल असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. 

Web Title: This is an act of cruelty, the petition for cockfighting is rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.