हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
By योगेश पांडे | Updated: April 23, 2025 00:01 IST2025-04-23T00:00:53+5:302025-04-23T00:01:24+5:30
नागपूर : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून निषेध करण्यात आला आहे. हा ...

हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
नागपूर : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून निषेध करण्यात आला आहे. हा देशाच्या एकतेवर हल्ला असून सर्व राजकीय पक्षांनी मतभेदांच्या पलीकडे जात या प्रवृत्तीचा निषेध केला पाहिजे, असे आवाहन संघाकडून करण्यात आले आहे.
संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी या हल्ल्याचा निषेध केला. पहलगाम येथील दहशतवादी हल्ला अत्यंत निषेधार्ह आणि दुःखद आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आणि जखमी लवकर ठीक व्हावेत ही प्रार्थना करतो. हा हल्ला देशाच्या एकता आणि अखंडतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न आहे. सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांनी सर्व मतभेदांच्या पलीकडे जाऊन याचा निषेध केला पाहिजे. सरकारने सर्व पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करावी. या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना शिक्षा करण्यासाठी सरकारने लवकरच योग्य ती पावले उचलावीत, असे आवाहन होसबळे यांनी केले आहे.