हरीश साळवे, लीलाताई चितळे, शरद बाेबडे यांना यंदाचा ‘नागभूषण पुरस्कार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2022 01:31 PM2022-11-15T13:31:40+5:302022-11-15T14:39:55+5:30

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार पुरस्काराचे वितरण

This year's 'Nagabhushan Award' to Harish Salve, Leelatai Chitale, Sharad Bobde | हरीश साळवे, लीलाताई चितळे, शरद बाेबडे यांना यंदाचा ‘नागभूषण पुरस्कार’

हरीश साळवे, लीलाताई चितळे, शरद बाेबडे यांना यंदाचा ‘नागभूषण पुरस्कार’

googlenewsNext

नागपूर : नाग भूषण अवॉर्ड फाउंडेशनच्या वतीने दिला जाणाऱ्या नागभूषण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. २०१९ सालासाठी नामवंत विधिज्ञ ॲड. हरीश साळवे, २०२० सालासाठी ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी लीलाताई चितळे आणि २०२१ सालासाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश व महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाचे कुलपती शरद बोबडे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

हा पुरस्कार प्रदान सोहळा शुक्रवारी, १८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५.३० वाजता रॅडिसन ब्ल्यू हॉटेलच्य समीट हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरित करण्यात येणार असून, अध्यक्षस्थानी माजी खा. अजय संचेती असणार आहेत.

Web Title: This year's 'Nagabhushan Award' to Harish Salve, Leelatai Chitale, Sharad Bobde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.