स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेगाड्यांची कसून तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:09 AM2021-08-15T04:09:34+5:302021-08-15T04:09:34+5:30
नागपूर : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कुठलीही अप्रिय घटना होऊ नये यासाठी लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलातर्फे रेल्वेगाड्या, प्लॅटफॉर्म आणि ...
नागपूर : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कुठलीही अप्रिय घटना होऊ नये यासाठी लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलातर्फे रेल्वेगाड्या, प्लॅटफॉर्म आणि रेल्वे परिसराची कसून तपासणी करण्यात येत आहे. बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच श्वान पथकाच्या माध्यमातून संवेदनशील रेल्वेगाड्यांची पाहणी करण्यात येत आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त घातपाताच्या कारवाया होऊ नये यासाठी देशभरात सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली आहे. नागपूर रेल्वेस्थानक हे संवेदनशील समजल्या जाणाऱ्या रेल्वेस्थानकांपैकी एक आहे. त्यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. रेल्वेगाड्या, प्लॅटफॉर्मची तपासणी करण्यात येत आहे. नागपूर हे देशाच्या मध्यभागी आहे. येथून चारही दिशांना रेल्वेगाड्या जातात. त्यामुळे रेल्वेस्थानकाची सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली आहे. दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाताकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची विशेषत्वाने तपासणी करण्यात येत आहे. रेल्वे स्थानकाच्या बाहेरील म्हणजे आऊटरकडील भागातही आरपीएफ जवान तैनात करण्यात आले आहेत. संशयित दिसताच त्यांची सखोल चौकशी केली जात आहे. बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच श्वान पथकाने शनिवारी नागपूर, इतवारी, अजनी आणि कामठी रेल्वे स्थानक पिंजून काढला.
..........