त्या मृत पक्ष्यांना बर्ड फ्लू नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:09 AM2021-01-15T04:09:15+5:302021-01-15T04:09:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी पक्षी मृत्युमुखी पडले. कोंढाळी भागातील मृत पावलेले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी पक्षी मृत्युमुखी पडले. कोंढाळी भागातील मृत पावलेले पोपट आणि कबुतराचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला. काही भागात पक्षी मृत पावल्याच्या घटना समोर आल्या. अशा ठिकाणी विशेष पाळत ठेवण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी युवराज केने यांनी सांगितले.
कोंढाळी या भागातील रिगणाबोंडी, मिनिवाडा, मसाळा, चाकडोह आदी भागात गेल्या काही दिवसांपासून पोपट, चिमण्या, कावळे, जंगली कबुतर आदी पक्ष्यांचा मोठ्या संख्येने अज्ञात आजाराने मृत्यू झाल्याचे समोर आले. रिंगणाबोडी येथे झाडाखाली मृत पोपटांचा सडा पडलेला आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. पक्ष्यांचा मृत्यू कशाने झाला, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. मृत पाच पोपट आणि एका कबुतराचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. बर्ड फ्लू अहवाल निगेटिव्ह आला. तर कळमेश्वर तालुक्यातील उबगी येथील पोल्ट्री फार्ममधील २५० वर कोंबड्या मृत आढळल्या. तर दुसऱ्या फार्ममधील कोंबड्या मृत मिळाल्या. मौदा येथील एक व्यक्तीच्या शेतात कोंबड्या मरण पावल्याची घटना समोर आली. सर्वांचे नमुने तपासणी पाठविण्यात आले असून त्या ठिकाणी विशेष लक्ष देण्यात येत असल्याचे केने यांनी सांगितले.