‘त्या’ सुवर्णपदकाची चौकशी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 10:03 PM2018-03-26T22:03:01+5:302018-03-26T22:03:22+5:30

सुवर्णपदकासंदर्भात नेमका घोळ कसा झाला याची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.

'Those' gold medals will be investigated | ‘त्या’ सुवर्णपदकाची चौकशी करणार

‘त्या’ सुवर्णपदकाची चौकशी करणार

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूर विद्यापीठ : गुणवंत विद्यार्थिनीला ‘एमएड’ऐवजी मिळाले ‘बीएड’चे सुवर्णपदक


लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०५ वा दीक्षांत समारंभादरम्यान सुवर्णपदकांच्या संभ्रमामुळे प्रशासकीय डोकेदुखी वाढली आहे. ‘एमएड’मध्ये सर्वाधिक ‘सीजीपीए’ मिळविणाऱ्या विद्यार्थिनीच्या सुवर्णपदकावर चक्क ‘बीएड’ची नोंद करण्यात आल्याच्या मुद्यावर सोमवारी विद्यापीठातील अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. संबंधित सुवर्णपदकासंदर्भात नेमका घोळ कसा झाला याची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर विद्यापीठ वर्तुळात सुवर्णपदकाचीच चर्चा होती.
नागपूर विद्यापीठात दानदात्यांकडून आलेल्या निधीतून विद्यार्थ्यांना पदके व पारितोषिके देण्यात येतात. ‘एमएड’ परीक्षा प्रथम प्रयत्नांत उत्तीर्ण करून सर्वात जास्त ‘सीजीपीए’ मिळविल्याबद्दल सुयश कॉलेज आॅफ एज्युकेशनच्या प्रियंका दुबे-तोडकर यांना पाच सुवर्णपदकांनी सन्मानित करण्यात आले. यात डॉ.जी.एस.पाराशर, विद्यापीठ पदव्युत्तर शिक्षणविभाग रजत महोत्सव सुवर्णपदकाचादेखील समावेश होता. परंतु ‘एमएड’ अभ्यासक्रमाऐवजी यावर ‘बीएड’ची नोंद होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच प्र-कुलगुरू डॉ.येवले यांनी तत्काळ परीक्षा विभागातील अधिकाºयांना यासंदर्भात विचारणा केली. पदकांसंदर्भातील सर्व यादी परीक्षा विभागात तयार होते व ती पदकविजेत्यांच्या नावासह कंत्राटदाराला देण्यात येते. त्यामुळे या पदकाबाबत नेमका कुठे घोळ झाला हे शोधण्याची सूचना परीक्षा विभागाला दिली आहे. तसेच परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.नीरज खटी यांच्याशी या मुद्यावर चर्चादेखील झाली असल्याचे डॉ.येवले यांनी सांगितले.

Web Title: 'Those' gold medals will be investigated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.