मुंबई-पुण्याहून आलेल्यांनी वाढविली नागपूर जिल्ह्याची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 09:44 PM2020-05-30T21:44:37+5:302020-05-30T21:46:06+5:30

शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना ग्रामीण भागातही कोरोनाचे संक्रमण वाढू लागले आहे. मुंबई, पुण्याहून आलेल्या प्रवाशांनी ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव केला आहे. तब्बल दोन महिने कोरोनामुक्त असलेल्या नागपूर जिल्ह्यात आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे.

Those from Mumbai-Pune increased the headache of Nagpur district | मुंबई-पुण्याहून आलेल्यांनी वाढविली नागपूर जिल्ह्याची डोकेदुखी

मुंबई-पुण्याहून आलेल्यांनी वाढविली नागपूर जिल्ह्याची डोकेदुखी

googlenewsNext
ठळक मुद्देवाढतेय संक्रमितांची संख्या

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना ग्रामीण भागातही कोरोनाचे संक्रमण वाढू लागले आहे. मुंबई, पुण्याहून आलेल्या प्रवाशांनी ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव केला आहे. तब्बल दोन महिने कोरोनामुक्त असलेल्या नागपूर जिल्ह्यात आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे.
चौथ्या लॉकडाऊननंतर शासनाने दिलेली शिथिलता व यानंतर इतर जिल्ह्यात राज्यात अडकलेल्या नागरिकांचा जिल्ह्यातील प्रवेश यामुळे ग्रामीण भागामध्ये प्रादुर्भाव वाढत आहे. नागपूर जिल्ह्याच्या बाहेर अडकन पडलेले नागपूर जिल्ह्यातील गावात पोहोचत आहेत. तसे प्रशासनाने या नागरिकांना गावातील शाळेत, समाजभवनात क्वारंटाईन केले आहे. परंतु क्वारंटाईनच्या भीतीमुळे काही महाभाग प्रशासनाला न सांगताच पळ काढत आहेत. एप्रिल महिन्यात कामठी आणि कन्हान या भागातच कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. मात्र हे दोन्ही रुग्ण उपचारानंतर बरे झाले. परंतु शासनाने बाहेरील राज्यात अडकलेल्या नागरिकांना आपल्या मूळ गावी परत येण्याची मुभा दिल्यामुळे रुग्णांच्या संख्येत आता वाढ होत आहे. जिल्ह्यातील कामठी, कन्हान, खरबी, बुटीबोरी, दुधाळा (कोंढाळी), दहेगाव रंगारी (सावनेर), सोनोली (कळमेश्वर), मन्नाथखेडी (नरखेड), गुमगाव (हिंगणा), कोराडी येथेही आता कोरोनाच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात कोरोनाची दहशत पसरत आहे. अशात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सतर्क झाली आहे.

शासकीय कार्यालयात भीतीचे वातावरण
ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने जनता जिल्हा परिषदेत येते. सध्या जिल्हा परिषदेत बहुतांश योजनांची अंमलबजावणी थांबवली आहे. परंतु दलित वस्ती सुधार योजनेच्या कामांची अंमलबजावणी सुरू आहे. त्यासाठी दलित वस्तीचे प्रस्ताव, त्या संदर्भातील चौकशीसाठी नागरिक जिल्हा परिषदेत येत आहेत. लोकप्रतिनिधीसुद्धा दलित वस्तीच्या कामांसाठी गर्दी करीत आहेत. मात्र ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन त्यांच्याकडून होताना दिसत नाही. जिल्हा परिषदेत सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. परंतु ग्रामीण भागातून होत असलेली गर्दी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असल्याची भावना कर्मचाºयांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Those from Mumbai-Pune increased the headache of Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.