सोशल मीडियावरील ‌‘आर्थिक मदती’च्या 'त्या पोस्ट' तद्दन खोट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 11:04 AM2021-03-16T11:04:33+5:302021-03-16T11:05:06+5:30

Nagpur News कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटकाळात समाजकंटकांनी सोशल मीडियाद्वारे फसव्या पोस्ट टाकून नागरिकांना आमिष देणे सुरू केले आहे. या माध्यमातून आर्थिक फसवणूक होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन केले आहे.

'Those posts' of 'financial help' on social media are totally false | सोशल मीडियावरील ‌‘आर्थिक मदती’च्या 'त्या पोस्ट' तद्दन खोट्या

सोशल मीडियावरील ‌‘आर्थिक मदती’च्या 'त्या पोस्ट' तद्दन खोट्या

Next
ठळक मुद्देनागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन

 लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटकाळात समाजकंटकांनी सोशल मीडियाद्वारे फसव्या पोस्ट टाकून नागरिकांना आमिष देणे सुरू केले आहे. या माध्यमातून आर्थिक फसवणूक होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन केले आहे.

१ मार्च २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ज्या घरातील २१ ते ७० या वयोगटातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाले, त्या व्यक्तीच्या विधवेला महिला व बाल विकास विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या जिजामाता/जिजाऊ या योजनेअंतर्गत ५० हजार रुपये मदत मिळणार असल्याची पोस्ट ‘व्हाॅट्सॲप’वर फिरत आहे. मात्र हा संदेश पूर्णत: चुकीचा बनावट असून अशी कुठलीच योजना विभागामार्फत कार्यान्वित नाही, असे महिला व बाल विकास विभागाच्या उपायुक्तांनी जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळविले आहे. वेगाने ‘व्हायरल’ होत असलेल्या अशाप्रकारच्या संदेशामुळे नागरिकांची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी अशा फसव्या संदेशांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अपर्णा कोल्हे यांनी केले आहे.

 

Web Title: 'Those posts' of 'financial help' on social media are totally false

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.