काॅलेज बंद करणाऱ्यांची व्हावी चाैकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:08 AM2021-02-07T04:08:28+5:302021-02-07T04:08:28+5:30
नागपूर : मागील तीन वर्षांंत एकापाठाेपाठ एक अशी १२१ महाविद्यालये आणि अभ्यासक्रम बंद करण्यास राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाने ...
नागपूर : मागील तीन वर्षांंत एकापाठाेपाठ एक अशी १२१ महाविद्यालये आणि अभ्यासक्रम बंद करण्यास राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाने मंजुरी दिली आहे. यावर महाविद्यालयांच्या अस्थायी शिक्षक संघटना नाेबल इंजिनीअरिंग टिचर्स असाेसिएशन (नेता)ने प्रश्न उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चाैकशी करण्याची मागणी संघटनेने राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. साेबतच काॅलेज बंद करण्याचा निर्णय रद्द करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
नीलेश पंचबुधे यांच्या नेतृत्वात संघटनेच्या प्रतिनिधी मंडळाने शुक्रवारी उदय सामंत यांना निवेदन सादर केले. विद्यापीठ कुलगुरूंनी विशेषाधिकाराचा वापर करीत काॅलेज बंद करण्याला मंजुरी दिली. विना अनुदानित महाविद्यालयांमध्ये अनेक शिक्षक असे आहेत ज्यांना विद्यापीठाची मान्यता मिळाली आहे. मात्र या शिक्षकांना नियमानुसार वेतन दिले जात नाही. सातव्या वेतन आयाेगानुसार वेतन मिळणे तर दूरची गाेष्ट आहे. विद्यापीठ प्रशासनाला याबाबत माहिती देण्यात आली हाेती. मात्र प्रशासनाने अद्याप याबाबत चाैकशी केली नाही. या प्रकरणाचीही चाैकशी करण्याची मागणी संघटनेने केली आहे. साेबतच शिक्षकांना न्याय देण्याची विनंती केली आहे.