धिक्कार आहे, ज्यांना मुंबई, महाराष्ट्र असुरक्षित वाटत असेल त्यांना इथे राहण्याचा अधिकार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 03:27 PM2020-09-04T15:27:50+5:302020-09-04T15:28:16+5:30
मुंबई पोलिस स्कॉटलँड पोलिसांच्या दर्जाची समजली जाते, ज्यांना मुंबईत राहणे सुरक्षित नाही असे वाटते त्यांना मुंबई किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, ज्या कुणी कलाकाराने हे वक्तव्य केले, त्याचा आम्ही निषेध करतो अशी प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगना राणावतच्या वक्तव्यावर केली आहे.
नागपूर : मुंबईपोलिस स्कॉटलँड पोलिसांच्या दर्जाची समजली जाते, ज्यांना मुंबईत राहणे सुरक्षित नाही असे वाटते त्यांना मुंबई किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, ज्या कुणी कलाकाराने हे वक्तव्य केले, त्याचा आम्ही निषेध करतो अशी प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगना राणावतच्या वक्तव्यावर केली आहे.
अलीकडेच कंगना राणावतने मुंबईत सुरक्षित वाटत नाही अशा आशयाचे वक्तव्य केले होते. त्यावर सध्या राज्यात चर्चा असून, कंगना राणावतनेही आपण मुंबईत येत असून, कोण आपल्याला रोखतो तेच पाहतो, असेही एक विधान केले आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, शिवसेनेने पाठोपाठ मनसेने कंगना राणौतला धमकीवजा इशारा दिला आहे. मात्र, मी ९ सप्टेंबरला मुंबईत येत आहे, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा, अशा शब्दात कंगना राणौतने ट्विटरवरुन आव्हान दिले आहे.
"मला अनेक जण मुंबईला परत न येण्याची धमकी देत ??आहेत, म्हणून मी ठरवले आहे की, येत्या आठवड्यात 9 सप्टेंबरला मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी मुंबई विमानतळावर किती वाजता उतरणार, याची वेळ लवकरच सांगेन. कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा", अशा शब्दात कं असा एल्गार कंगनाने केला. भाजपा नेते परवेश साहिब सिंह यांच्या ट्विटला रिट्विट करत कंगनाने असे म्हटले आहे. "कुणाच्या वडिलांची जहागीर आहे का मुंबई? महाराष्ट्रात काय होत आहे उद्धव ठाकरे?" असा सवाल परवेश साहिब सिंह यांनी केला होता.