ज्यांनी राम सेतू नाकारला तेच वाघ नखांवर टीका करताहेत
By कमलेश वानखेडे | Published: July 18, 2024 06:35 PM2024-07-18T18:35:06+5:302024-07-18T18:36:50+5:30
विरोधी पक्षाचे लोक म्हणजे इतिहासकार नाहीत : सुधीर मुनगंटीवार
कमलेश वानखेडे
नागपूर : वाघ नखांवर टिका करणारी काही विशेष लोक आहेत. प्रभू रामाचा विषय होता तेव्हाही ते काल्पनिक कथा आहे असं म्हणायचे. राम सेतूचा विषय होता तेव्हाही सुप्रीम कोर्टात गेले, असे उत्तर वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी दिले.
गुरुवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, विरोधी पक्षाचे लोक म्हणजे इतिहासकार नाही. त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्यांची एक सवय आहे. त्यामुळे त्यांचं पोट दुखणं स्वाभाविक आहे. मताचे तृष्टीकरण करण्यासाठी असे प्रश्न उपस्थित करतात.
१९८९ मध्ये विधानसभेत झालेली चर्चा एकदा ऐका. अतिशय उत्तम चर्चा झाली, त्या ऐकल्यावर लक्षात येईल. अजित पवार यांच्या घर वापसीचे संगीताबद्दल विचारणा केली असता शरद पवारांना विचारलं पाहिजे, असे सांगत त्यांनी प्रश्न टाळला. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमची मैत्री आहे आणि ती पुढेही राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.