भाजपने तिकीट कापले तरी निधान मैदानात - जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:09 AM2021-07-07T04:09:09+5:302021-07-07T04:09:09+5:30

पक्षाच्या ‘बी’ फॉर्मच्या संदर्भात घोळ झाल्याने तिघांनीही उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपचा ‘बी’ फॉर्म जोडला नाही. पक्षात बंडखोरी ...

Though BJP cut the ticket, in Nidhan Maidan - Jod | भाजपने तिकीट कापले तरी निधान मैदानात - जोड

भाजपने तिकीट कापले तरी निधान मैदानात - जोड

Next

पक्षाच्या ‘बी’ फॉर्मच्या संदर्भात घोळ झाल्याने तिघांनीही उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपचा ‘बी’ फॉर्म जोडला नाही. पक्षात बंडखोरी झालेली नाही. योगेश डाफ आमचा अधिकृत उमेदवार आहे. दोघेही अर्ज मागे घेतील.

अरविंद गजभिये, जिल्हाध्यक्ष, भाजप

०-०-०-०-०-०-०-०-

भाजपने बदलले ९ उमेदवार, आघाडीने सेनेला केले दूर

विरोधी पक्षनेत्यांचे कापले तिकीट : काँग्रेसने बदलला विद्यमान सदस्य

नागपूर : जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपमध्ये चमत्कारिक बदल बघायला मिळाले. भाजपने थेट विरोधी पक्षनेत्याबरोबरच गेल्या वेळी निवडणुकीत पराभूत झालेल्या ८ सदस्यांच्या जागी नवीन चेहरे मैदानात उतरविले. काँग्रेसनेही एका जागेवर विद्यमान सदस्याला डावलून दुसऱ्याला उमेदवारी दिली. या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीत शिवसेनेला दूर सारल्याने १२ जागांवर शिवसेनेने एकप्रकारे काँग्रेस, राष्ट्रवादीलाच आव्हान दिले.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने ओबीसीचे १६ सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले. यामध्ये काँग्रेसचे ७, राष्ट्रवादी ४, भाजप ४ व शेकापच्या १ सदस्याचा समावेश होता. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडीत काँग्रेसकडे १० तर राष्ट्रवादीकडे ५ जागा आल्या. राष्ट्रवादीच्या सुचिता ठाकरे या सदस्याने भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने, राष्ट्रवादीने हरलेल्या भाजपच्या सदस्याला उमेदवारी दिली. तर गटनेते चंद्रशेखर कोल्हे यांनी आपल्या पत्नीला रिंगणात उतरविले. काँग्रेसमध्ये उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनीही पत्नीला उमेदवारी दिली. तर गोधनी रेल्वे या जिल्हा परिषद सर्कलमधून विद्यमान सदस्य ज्योती राऊत यांना उमेदवारी नाकारून माजी युथ काँग्रेस अध्यक्ष कुंदा राऊत यांचा अर्ज दाखल केला.

तर भाजपमध्ये मोठा बदल दिसून आला. गेल्या वेळी पराभूत झालेल्या ९ कार्यकर्त्यांना भाजपने संधी नाकारली. चक्क विरोधी पक्षनेत्याला उमेदवारी नाकारून नवीन चेहरा उभा केला. इतर तीन विद्यमान सदस्यांना भाजपने कायम ठेवले. विशेष म्हणजे अरोली सर्कलमधून पराभूत झालेले अशोक हटवार यांच्या जागी माजी उपाध्यक्ष सदानंद निमकर यांना उमेदवारी देण्यात आली. पारडसिंगा सर्कलमधून पराभूत झालेले संदीप सरोदे यांनी यंदा आपल्या पत्नीला रिंगणात उभे केले.

- अखेरच्या दिवशी २५२ अर्ज

निवडणुकीचा कार्यक्रम प्रसिद्ध झाल्यानंतर २९ जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करायचे होते. शनिवारपर्यंत केवळ १८ अर्ज निवडणूक विभागाकडे दाखल झाले होते. सोमवारी अखेरच्या दिवशी अर्जाची एकूण संख्या २७० एवढी झाली. यात जिल्हा परिषदेसाठी १०६ व पंचायत समितीसाठी १६४ उमेदवारी अर्ज दाखल झाले.

Web Title: Though BJP cut the ticket, in Nidhan Maidan - Jod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.