नागपुरात गोवारी शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उमडला जनसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 02:10 PM2017-11-23T14:10:30+5:302017-11-23T14:17:10+5:30
23 वर्षापूर्वी नागपुरात गोवारी बांधवांच्या झालेल्या अपघाती मृत्यूच्या शहीद दिनानिमित्त आज गुरुवारी हजारो गोवारींनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : 23 वर्षापूर्वी नागपुरात गोवारी बांधवांच्या झालेल्या अपघाती मृत्यूच्या शहीद दिनानिमित्त आज गुरुवारी हजारो गोवारींनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. २३ नोव्हेंबर १९९४ हा दिवस गोवारी बांधवासाठी काळा दिवस ठरला. अनुसूचित जमातीत समावेश करण्यासाठी विधीमंडळावर काढण्यात आलेल्या मोर्चात झालेल्या चेंगराचेंगरीने ११४ गोवारी बांधव शहीद झाले होते. शासनाने या घटनेनंतर झिरो माईल चौकात शहीद गोवारी स्मारक उभारले. तेव्हापासून दरवर्षी विदर्भातील कानाकोपऱ्यातून गोवारी बांधव २३ नोव्हेंबर रोजी स्मारकावर येतात. शहीदांच्या आठवणींना उजाळा देतात. साश्रुनयनाने पुष्प अर्पण करतात. या दुर्दैवी घटनेबद्दल शासनाला कोसतात. सकाळपासून श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गोवारी बांधवाच्या रॅली विविध भागातून निघाल्या आहेत. शहरातील नेतेमंडळींनीही गोवारी स्मारकाला भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली आहे.