हजारो टन बारूद, डिटोनेटर्सची सुरक्षा वाऱ्यावर; नियमांचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2022 11:07 AM2022-05-18T11:07:13+5:302022-05-18T11:19:55+5:30

लोकमत प्रतिनिधीने मंगळवारी एका स्फोटके उत्पादन कंपनीच्या परिसराची पाहणी केली असता, येथे कोणीही विनाअडथळा पोहोचू शकत असल्याचे दिसून आले.

Thousands of tons of ammunition, detonators are in open and easily accessible to wrong hand due to security negligence | हजारो टन बारूद, डिटोनेटर्सची सुरक्षा वाऱ्यावर; नियमांचे उल्लंघन

हजारो टन बारूद, डिटोनेटर्सची सुरक्षा वाऱ्यावर; नियमांचे उल्लंघन

Next
ठळक मुद्देकाटोल-अमरावती मार्ग लिंक रोडवरील धोकादायक चित्र

कमल शर्मा

नागपूर : उपराजधानीला हजारो किलो बारूदचा धोका आहे, हे वाचून कोणालाही विश्वास बसणार नाही; परंतु हे सत्य आहे. लोकमत प्रतिनिधीने मंगळवारी एका स्फोटके उत्पादन कंपनीच्या परिसराची पाहणी केली असता, येथे कोणीही विनाअडथळा पोहोचू शकत असल्याचे दिसून आले. गेल्या आठवड्यात नागपूर रेल्वेस्थानक येथे स्फोटके आढळून आल्यानंतरदेखील ही परिस्थिती आहे. मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ नागपूरमध्ये तयार झालेले डिटोनेटर मिळाले होते, तसेच काही दहशतवादी हल्ल्यांमध्ये नागपूर मार्कची स्फोटके आढळून आली होती.

एस.बी.एल. असे या कंपनीचे नाव असून, काटोलजवळच्या अमरावती मार्ग (बाजारगाव) लिंक रोडवरील राऊळगाव परिसरात कंपनीचा प्रकल्प आहे. या परिसराची पाहणी केली असता, लिंक रोडपासून ५०० मीटर अंतरावर स्फोटके वाहून नेणारी वाहने उभी होती. तेथे एक प्रवेशद्वार आहे. वाहन आत नेताना कोणीच टोकले नाही. तेथे लोखंडी जाळीचे कुंपण असून, ते ठिकठिकाणी तुटले आहे. तेथून कोणीही आरामात आत जाऊ शकतो व बाहेर निघू शकतो. हे ठिकाण काटोल व कळमेश्वर तालुका हद्दीत विभागले आहे. त्यामुळे पोलीस व प्रशासकीय कारवाईत अडचणी येत आहेत. या परिसरात इतर पाच कारखाने आहेत. सर्व कारखान्यांत स्फोटके व डिटोनेटर ठेवली आहेत.

स्टोरेजमधून नव्हे, तर उघड्यावर होत आहे विक्री

स्फोटके तयार झाल्यानंतर त्यांना स्टोरेजमध्ये (मॅगझिन) ठेवणे आवश्यक आहे. मात्र, येथे उघड्यावर (फ्लोअर) स्फोटकांना विक्रीसाठी ट्रकमध्ये ठेवले जाते. ‘लोकमत’च्या पाहणीत असे दिसून आले की, कच्च्या रस्त्यापासून सुमारे २०० मीटर अंतरावरील कार्यालय/ गेस्ट हाऊसमध्येही स्फोटके ठेवली होती. स्फोटकांची काही पोती बाहेरच ठेवलेली आढळली.

जबाबदार व्यक्तीशिवाय केले जाते नष्ट

स्फोटके बनविण्याच्या प्रक्रियेत १० ते १५ टक्के बारूद खराब होते. नियमांनुसार हे बारूद जबाबदार व्यक्तीच्या उपस्थितीत ‘बर्निंग पीट’मध्ये (खड्डा) नष्ट करावे लागते. मात्र, कारखान्यात हे काम कामगार आपला जीव धोक्यात घालून करीत आहेत. येथे बारूद असेच सोडून दिले जाते. या परिसरातून कुणीही सहज ये-जा करू शकतो. विशेष म्हणजे बहुतांश कंपन्यांकडे नष्ट करण्यात आलेल्या बारूदचे रेकॉर्डही नाही.

गवत जाळण्यासाठी लावली आग

स्टोरेजच्या (मॅगझिन) बाजूला असलेले गवत नष्ट करण्यासाठी आग लावण्यात आली होती. तेथे जमिनीवर पसरलेल्या राखेवरून हे स्पष्ट झाले. ही आग चुकीने बारूदपर्यंत पोहोचली असती तर मोठी दुर्घटना घडली असती.

स्फोटके व्यवसायात नागपूरची स्थिती

कंपन्या : जिल्ह्यात २० तर, देशात २५० कारखाने आहेत.

क्षमता : रोज ३५ हजार टन बारूद व ४० हजार डिटोनेटर.

उपलब्धता : एका कारखान्यात ५०० ते १००० किलो बारूद आहे.

स्थान : बहुतांश कंपन्या अमरावती रोड, काटोल रोड बायपासवर आहेत.

लायसन्स रद्द केले जाईल

हा परिसर टेस्टिंग युनिटच्या क्षेत्रात येतो. या ठिकाणी केल्या जात असलेल्या निष्काळजीपणाची माहिती मिळाली आहे. कंपनीला नोटीस बजावली आहे. सुरक्षा नियमांचे असेच उल्लंघन होत राहिल्यास कंपनीचे लायसन्स रद्द केले जाईल. सुरक्षेवर सूक्ष्म लक्ष ठेवले जात आहे.

- एस. डी. मिश्रा, जॉइंट चीफ कंट्रोलर ऑफ एक्स्प्लोसिव

Web Title: Thousands of tons of ammunition, detonators are in open and easily accessible to wrong hand due to security negligence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.