हजारोंनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ
By admin | Published: May 22, 2016 02:56 AM2016-05-22T02:56:59+5:302016-05-22T02:56:59+5:30
नागपूरचे खासदार, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त
भाजपचे आरोग्य महाशिबिर : दक्षिण-पश्चिम नागपुरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर : नागपूरचे खासदार, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्राच्यावतीने दीक्षाभूमी येथील बी.आर.ए. मुंडले स्कूल येथे आरोग्य महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे. २७ तारखेपर्यंत चालणाऱ्या या शिबिरात पहिल्याच दिवशी हजारो नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
महापौर प्रवीण दटके यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, मुख्य संयोजक संदीप जोशी, ेसहसंयोजक प्रकाश भोयर, गोपाल बोहरे प्रामुख्याने उपस्थित होते.
हे आरोग्य शिबिर २६ मे पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालेल. २७ मे रोजी सकाळी ७.३० ते दुपारी १.३० वाजतापर्यंत चालेल. शिबिरात मेडिकलसह खासगी डॉक्टरांची मदत घेण्यात आली आहे. या शिबिरात तज्ञ डॉक्टर आणण्यात आले आहे. या शिबिराला नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिरासाठी यापूर्वीच ६ हजार नागरिकांनी नोंदणी केली होती. त्यामुळे शिबिरासाठी चांगलीच गर्दी होती. वेळेवेर नोंदणी करण्याची व्यवस्थाही होती. प्रत्येक रुग्णांची संपूर्ण माहिती संगणकावर अपलोड केली जात आहे. प्रत्येकाची एक स्वतंत्र फाईल तयार करण्यात येत आहे. तपासणीकरिता प्रत्येक आजाराकरिता स्वतंत्र विभागाची व्यवस्था करण्यात आली होती. अस्थिरोग, नेत्ररोग, मेंदूरोग, बाळरोग विभाग, स्त्रीरोग विभाग आदींचे स्वतंत्र विभाग तयार करण्यात आले आहेत. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्य निसवाडे यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांची चमू स्वत: या शिबिरावर लक्ष ठेवून आहेत. यावेळी प्रा. राजीव हडप, विवेक तरासे, रमेश सिंगारे, मुन्ना यादव, अविनाश ठाकरे, किशोर वानखेडे, आशिष पाठक, सचिन कराळकर, श्रीपाद बोरीकर, सुरेंद्र पांडे, यांच्यासह नगरसेवक, भाजपचे बूथप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.